
Mp Viral Video: रेल्वे स्थानकावर घडलेली एक थरारक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल घटनेत एक वृद्ध प्रवासी मोबाईलमध्ये इतके गुंग झाले की, समोर उभी असलेली ट्रेन चुकवून बसले. जेव्हा ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी धावत जाऊन चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेला आणि ते थेट ट्रॅकवर कोसळले. सुदैवाने, त्याचवेळी जवळच असलेल्या आरपीएफ च्या जवानाने प्रसंगावधान राखत त्यांना वाचवलं.
ही घटना नेमकी कधीची आहे ते समजले नाही,परंतू ही घटना मध्य प्रदेशमधील बैतूल रेल्वे स्टेशनवरची आहे. संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रसंग कैद झाली आहे. हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे आणि अनेकजण या जवानाच्या तत्परतेचं कौतुक करत आहेत.
सीसीटीव्ही(CCTV) व्हिडिओमध्ये दिसतं की, एक वृद्ध प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. ते प्लॅटफॉर्मवर बसलेले दिसतात, त्यांच्या समोर ट्रेन उभी आहे, पण तरीही ते उठून चढण्याचा प्रयत्न करत नाहीत. काही क्षणांनी ट्रेन हालू लागते, तेव्हा त्यांना जाग येते आणि ते घाईघाईने उठून ट्रेनकडे धाव घेतात. त्यानंतर वृद्ध प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात, पण ट्रेन वेग घेत असते. त्यांनी दार पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तोल गेला. काही क्षणातच ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडतात. हा प्रसंग पाहून कोणाचेही अंग शहारले असते.
या सगळ्या प्रकारात सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, जवळच असलेला RPF जवान. या जवानाने एक क्षणही न दवडता त्या वृद्ध प्रवाशाला खेचून ट्रॅकवरून बाहेर काढलं. जर का हा जवान क्षणभर जरी उशीर करत, तर मोठा अनर्थ घडू शकला असता.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.