
Madhya Pradesh: उघडा नाला असो वा मॅनहोलमध्ये पडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जीव गमावणाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात लहान मुलांचा समावेश असतो. सध्या मध्य प्रदेशमधून एका धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. ज्या घडलेल्या घटनेत सुद्धा एका उघड्या नाल्यात एक चिमुकला पडला. सध्या चिमुकला सुखरुप असून संपूर्ण परिसरात लहान मुलांबाबात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेजमध्ये सुरुवातीस एक परिसर दिसत आहे. ज्या परिसरात असलेल्या नाल्यावर काही कडप्पे बसवलेले आहे मात्र एका भागातून नाल्यावर काहीही झाकलेले नाही, अशातच एक चिमुकला धावत येतो आणि नाल्याच्या आत जोरात पडतो. मात्र आजूबाजूला असलेले नागरिक तात्काळ तिथे येतात आणि मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सर्व व्हिडिओ तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
एबीपी न्यूज टीव्हीच्या वृत्तानुसार, व्हायरल होत असलेली घटना मध्य प्रदेशमधील सतना येथील आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच सर्वत्र हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''सरकार फक्त पैसे खाते, नाले बांधत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे लोक देवाच्या रूपात आले'' तर अन्य नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोगद्धात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.