Student Halgi Video: हलगीपुढे ढोलताशा फिका पडला; पहिलीतल्या मुलाच्या तालावर अख्खा गाव नाचला, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: डीझे कितीही मोठ्या आवाजात वाजला तरी हलगीची कमाल वेगळीच असते.
Student Halgi Video
Student Halgi VideoSaam TV

1st Standard Student Halgi Video:

भारतात सर्वच सण उत्सव आनंदाने साजरे केले जातात. नागरिक आपला आनंद व्यक्त करत ढोल ताशाच्या गजरात डान्स करतात. सध्याच्या काळात शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी डीजे आणि बँन्जो वाजताना पाहायला मिळतो. डीझे कितीही मोठ्या आवाजात वाजला तरी हलगीची कमाल वेगळीच असते. सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा हलगी वाजवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

Student Halgi Video
Pune Crime: पुणे शहरात चाललंय काय? खंडणीसाठी अपहरण करत महिलांना ठेवले डांबून; चौघांना अटक

हलगी किंवा अन्य कोणतेही वाद्य वाजवताना त्याचा सराव करावा लगतो. सराव केल्याशिवाय कोणतेही वाद्या वाजवता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क पहिलीत शिकत असलेल्या मुलाने अफलातून हलगी वाजवली आहे. त्याची कला पाहून सारेच चकित झालेत.

शाळा महाविद्यालयांत कोणत्याही कार्यक्रमात अथवा खेळताना ढोल ताशा वाजवला जातो. शाळेतीलच नववी किंवा दहावीत शिकणारी मुलं ढोल, ताशा वाजवतात. मात्र या शाळेत इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या चिमुकल्यने हलगी वाजवल्याने सर्वच आनंदी झाले. त्याची कला पाहून शिक्षकांसह अन्य पालक वर्ग आणि गावकऱ्यांनी या मुलाचे कौतुक केले आहे.

नेटकऱ्यांनी मुलाच्या या डान्सवर वेगवेगळ्या कमेंट केल्यात. हे फक्त मराठी शाळेतच बघायला मिळेल, असं एकाने म्हटलं आहे. तर आणखीन एकाने व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कमेंटमध्ये आपण स्वत: मुलाला हलगी वाजवताना पाहिल्याचं म्हटलंय. सदर व्हिडीओ साताऱ्याच्या जिल्हा परिषद शाळा कृष्णानगर येथील शाळेतला आहे. चिमुकला शाळेत १५ ऑगस्टला हलगी वाजवून दाखवत होता.

Student Halgi Video
Junnar Crime: पाळत ठेवून घरात शिरले.. कुटूंबाला मारहाण करत चोरी; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com