Junnar Crime: पाळत ठेवून घरात शिरले.. कुटूंबाला मारहाण करत चोरी; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Pune Latest News: राजुरी येथे एकांतात असणा-या दोन घरांवर पाळत ठेवुन चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Pune Crime News:

जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे एकांतात असणा-या दोन घरांवर पाळत ठेवुन चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी कुटूंबालाही मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Crime News
Pandharpur Crime News : आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला पाेलीस जबाबदार, अल्पवयीन मुलीच्या पालकांचा इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजुरी येथे सिताराम औटी आणि सुनील औटी यांच्या घरावर पाळत ठेवून चोरट्यांनी चोरी केली. मध्यरात्रीच्या सुमारास एकांत असलेल्या सिताराम औटी आणि सुनील औटी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी कुटुंबाला मारहाण करत दागिने आणि मोबाईलची चोरी केली.

तसेच पाठलाग करुन नये म्हणून चोरट्यांनी घरासमोरील दुचाकीचेही नुकसान केले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Crime Story)

यवतमाळमधूनही (Yavatmal) चोरीचे प्रकरण समोर आले आहे. यवतमाळच्या मारेगावातील माधव व ओम नगरीतील 8 जणांच्या घरी घरफोडी केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पोळा सण व सलग सुट्ट्या असल्याने येथील माधव नगरी व ओम नगरी, शांती नगर येथील आपल्या मूळ गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून हात साफ केला. एकाच रात्री आठ घरफोडी झाल्याने चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. (Latest Marathi News)

Crime News
Sambhajinagar News: मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; शहरानंतर आता जिल्ह्यांचीही नावे बदलली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com