Pandharpur Crime News : आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला पाेलीस जबाबदार, अल्पवयीन मुलीच्या पालकांचा इशारा

संबंधित मुलीचा शाेध सुरु आहे असेही पाेलिसांनी स्पष्ट केले.
Pandharpur Crime News
Pandharpur Crime Newssaam tv

Sangola News : साेलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेतील मुलीच्या पालकांनी पाेलिसांना तपास लवकरात लवकर करावा अन्यथा आत्मदहन करु असा इशारा दिला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Pandharpur Crime News
Vegetables Price Drop : पालेभाज्या, फळभाज्यांना मिळू लागला कवडीमाेल दर; हिंगाेलीतील शेतकरी आर्थिक गर्तेत

ही घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. या संदर्भात सांगोला पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या कुटुंबियांनी दाखल केलेली आहे. संबंधित मुलीच्या जीवाला धोका असल्याचे पालिकांनी म्हटले आहे.

Pandharpur Crime News
Gokul Dairy AGM : 'गोकुळ' च्या सभेत शौमिका महाडिकांचा आवाज दाबला, गुंड आणल्याचा सतेज पाटलांचा पलटवार (पाहा व्हिडिओ)

पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करावी अन्यथा आत्मदहन केले जाईल असा इशारा मुलीच्या पालकांनी पाेलिसांना दिला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पाेक्साे गुन्ह्यातील एका संशयिताने जामिनावर सुटल्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या पालकांनी दिली आहे. संबंधित मुलीचा शाेध सुरु आहे असेही पाेलिसांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com