Riding Bike With Girlfriend in His Lap Video Viral
Bengaluru VideoSaam TV

Bengaluru Video : खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला मिठीत घेत तरुणाचा प्रवास, VIDEO व्हायरल

Riding Bike With Girlfriend in His Lap Video Viral : घेही एकमेकांच्या प्रेमात इतके गुंग आहेत की, घर बसल्याप्रमाणे तरुणी तरुणाला मिठीमारून त्याच्या कुशीत बसली आहे. इतकंच नाही तर या दोघांनी
Published on

प्रेमाला वयाचं आणि जातीपातीचं बंधन नसतं हे खरं आहे. मात्र प्रेमाला जागेचं आणि आजुबाजूच्या माणसांचं समाजाचं बंधन असतं, हे अद्यापही अनेक प्रेमी युगुलांना समजलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कपल्सच्या अतरंगी करामतींचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Riding Bike With Girlfriend in His Lap Video Viral
Virat Kohli Viral Video:'बॅटने मारेन..' लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला - Video

एक जोडपं दुचाकीवरून जात आहे. रस्त्याने जाताना आपण कुठे आहोत, काय करतोय याचं काहीच भान या दोघांनाही उरलेलं नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके गुंग आहेत की, घरी बसल्याप्रमाणे तरुणी तरुणाला मिठीमारून त्याच्या कुशीत बसली आहे. इतकंच नाही तर या दोघांनी हायवेला दुचाकी चालवताना साधं हेल्मेट देखील घातलेलं नाहीये.

या प्रेमी युगुलाची करामत हायवेने जाणाऱ्या अन्य वाहनातील काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये शूट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत बंगळुरू पोलिसांना टॅग केलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना लगेचच ही बाब लक्षात आली. त्यांनी या दोघांचा शोध सुरु केला. ज्या ठिकाणाहून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले.

सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर त्यांना तरुणाची बाईक दिसली. त्यानंतर बाईकवरील नंबरच्या सहाय्याने पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्यात. प्रेमी युगुल उत्स्हाच्याभरात काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. भररस्त्यात अशा पद्धतीने वाहन चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते.

वाहतुकीचे नियम न पाळता अशा पद्धतीने तरुण मुलं-मुली वेगमर्यादा पाळत नाहीत परिणामी भीषण अपघात घडतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील व्हिडिओ पाहून त्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Riding Bike With Girlfriend in His Lap Video Viral
Iran Helicopter Crash: इराणच्या राष्ट्रपतींचा शेवटचा VIDEO आला समोर, हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com