
सोशल मीडियावर सध्या एक भावनिक आणि अंतर्मनाला भिडणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून त्या इमारतीच्या पाया पडताना दिसतात. हा प्रकार पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत, त्या व्यक्तीच्या भावनांना सलाम केला आहे.
सदर व्यक्ती कोण आहेत, याबाबत अधिक माहिती घेतली असता समजते की, हे कोणी सामान्य नागरिक नाहीत, तर ते स्वतः याच बंडगार्डन पोलीस(Police) स्टेशनमध्ये अनेक वर्षे सेवा देणारे एक पोलीस शिपाई आहेत. त्यांनी साधारण २०२१ साली निवृत्ती घेतली असून, त्यांच्या सेवाकाळात त्यांची लोकपाल ड्युटी होती.
नुकतेच त्यांनी वृत्तपत्रात एक बातमी वाचली की, बंडगार्डन पोलीस स्टेशनची इमारत पाडली जाणार आहे. ही बातमी वाचताच त्यांच्या मनात एक वादळ उठले. त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ या इमारतीत गेला होता. त्या इमारतीत काम करताना त्यांनी अनेक दिवस रात्रंदिवस सेवा दिली होती. हे ठिकाण त्यांच्या आठवणींचं, संघर्षाचं आणि कर्तव्य भावनेचं प्रतीक होतं.
बातमी वाचल्यानंतर, त्या वृद्ध निवृत्त पोलिसांनी ठरवलं की शेवटचा एकदा तरी पोलीस स्टेशनला भेट द्यायची आणि त्याला वाकून नमस्कार करायचा, त्यामुळेच ते थेट पोलीस स्टेशनसमोर गेले आणि पाया पडले. त्यांच्या चेहऱ्यावरचा भावनांचा जडपणा आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी सर्व काही सांगितलं.
हा व्हिडिओ (Video) समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने म्हटलं,''हे दृश्य पाहून अंगावर शहारे आले'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''आजच्या काळात जिथे माणसं नोकरी संपली की विसरतात, तिथे या माणसाने इमारतीला नमस्कार करून एक आदर्श ठेवला'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''त्यांच्या भावना त्यांच समजतील'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.”
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.