Fact Check: RBIनं गुपचूप विकलं सोनं? 1 लाख 14 हजार कोटींच्या सोन्याची विक्री?

No Gold Sold: आखाती युद्धानं जगभरात चिंतेचं वातावरण असतांना देशातील तब्बल 1 लाख 14 हजार कोटींच्या सोन्याची RBIनं विक्री केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... मात्र RBIनं खरचं देशातील सोन्यांची विक्री केलीय का? सोनं विकण्याची वेळ देशावर आलीये का? पाहा...
RBI dismisses claims of gold sale, confirms India’s gold reserves remain intact and growing.
RBI dismisses claims of gold sale, confirms India’s gold reserves remain intact and growing.saam tv
Published On

आखातातील युद्धामुळे जगभरात तणाव आणि आर्थिक मंदीची भिती असतांना आता देशाच्या राजधानीतून आलेल्या बातमीनं खळबळ माजलीये. आरबीआयनं युद्धजन्य परिस्थितीमुळे परकीय चलनची गंगाजळी वाचवण्यासाठी आपल्या तिजोरीतलं १२ अब्ज डॉलर्संचं सोनं विकल्याचा दावा करण्यात आलाय. ही बातमी समोर आल्यानं देशात चिंतेचं वातावरण पसरलंय. एकीकडे आर्थिक मंदी, नोकर कपात, इंधनाचे वाढलेले दर, गॅस टंचाई जगभरात असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात आता आरबीआयनं सोनं विकल्याची बातमी एका प्रतिष्ठित माध्यमसमुहानं प्रसिद्ध केली. त्यामुळे मोठी खळबळ माजली. य़ामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं...

आरबीआयनं सोनं विकल्याची बातमी समोर आल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती अंत्यत खालावल्याची चर्चा सुरू झाली. त्यात आरबीआयनं अत्यंत गुप्तपणे सोनं विकल्यानं देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आता आरबीआयनं याबाबत खुलासा केलाय.

सोने विक्रीवर RBIचा खुलासा

सोनं विकल्याच्या बातम्या तथ्यहीन

एक ग्रॅमही सोनं विकलेलं नाही.

आरबीआयमध्ये सोनं सुरक्षित आहे

2025च्या तुलनेत 2026 मध्ये सोन्याचा साठा वाढलाय

आरबीआयच्या तिजोरीत 880.52 टन सोनं आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा सातत्यानं वाढतोय. २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये आरबीआयकडील सोनंही वाढलंय. म्हणजेच देशाचं एक ग्रॅमही सोनं विकलं गेलं नसल्याचा दावा खुद्द आरबीआयनं केलाय. मग प्रश्न असा आहे की... देशाची आर्थिक परिस्थिती खालावल्याचा दावा करत आरबीआयनं १२ अब्ज डॉलर्सचं सोनं विकल्याची बातमी आली तरी कुठून? आणि त्यामागचा हेतू तरी काय? याचीच चर्चा आता रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com