रेशन आता एटीएममधून मिळणार असा दावा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल...कारण, सध्या एटीएममधून पैसे मिळतात एवढंच माहिती होतं...पण, आता धान्य मिळणार असल्याचा दावा केल्याने हे एटीएम कसं असेल याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय...रेशन एटीएम दुकानाप्रमाणेच गावागावात असणार आहे का...? कधीपासून एटीएम रेशन सुरू होणार आहे...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
सरकारकडून ATMद्वारे धान्य वितरणासाठी चाचपणी
नाशिक, ठाणे, नागपुरात प्रायोगिक तत्वावर प्रयोग राबवला जाणाराय
प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभरात तो लागू केला जाईल
देशात प्रथमच या प्रयोगासाठी महाराष्ट्राची निवड झालीय
3 जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाने होकार दिल्यास सरकार पुढे काम करणार
सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवला जाईल...त्यानंतर एटीएमच्या माध्यमातून रेशन देता येऊ शकतं का...? हे पाहिलं जाईल...पुढील टप्प्यात प्रत्यक्ष या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची यावर सरकार काम करेल...त्यानंतर लाभार्थींच्या हाती एटीएम कार्ड दिले जाईल...हे एटीएम कसं काम करेल पाहुयात...
रेशन ATM कसं काम करणार?
बँकांप्रमाणे रेशनसाठी 'धान्य ATM' असेल
लाभार्थ्यांना रेशनचं विशेष ATM कार्ड मिळेल
कार्ड स्वाईप करताच रेशनचं धान्य मिळणार
महिन्याला ठराविक कालावधीत धान्य ‘एटीएम’मध्ये जाऊन हे कार्ड स्वॅप केल्यानंतर लाभार्थींना त्यांच्या ‘रेशनकार्ड’वरील कोट्यानुसार रेशन उपलब्ध होईल...हा प्रयोग यशस्वी झाल्यास लाभार्थींची रेशन दुकानासमोर रांगेत उभे राहण्यातून मुक्तता होईल...मात्र, अजून हे रेशन एटीएम सुरू झालेलं नाही...याची चाचपणी सुरू आहे...पण, भविष्यात एटीएमवर रेशन मिळणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.