Fact Check: 30 जूनपासून कागदी नोटा बंद? 1 जुलैपासून प्लास्टिकच्या नोटा येणार?

Truth Revealed: आता 30 जूनपासून कागदी नोटा बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...आणि प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय...पण, खरंच आता कागदी नोटा बंद होणार आहेत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
Viral claim about banning paper currency from June 30 turns out to be false after fact check.
Viral claim about banning paper currency from June 30 turns out to be false after fact check.saam tv
Published On

हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय...त्यामुळे खरंच कागदी नोटा 30 जूनपासून बंद होणार आहेत का...? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे लोक संभ्रमात पडले आहेत...अचानक कागदी नोटा का बंद होणार आहेत...? प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आलाय का...?

या व्हिडिओमुळे संभ्रम निर्माण झालाय...नोटाबंदी पुन्हा होणार आहे का...? मग कागदी नोटांचं काय करायचं...? ते चलन पुन्हा बँकेत जमा करायचं आहे का..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी आरबीआयच्या साईटवरून काही याबाबत निवेदन जारी केलीय का हे पाहिलं...पण आरबीआयच्या साईटवर अशी कोणतीही प्रेस नोट दिसली नाही...तसंच आम्ही तज्ज्ञांकडूनही माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

30 जूनपासून कागदी नोटा चलनातच राहणार

प्लास्टिक नोटा आणण्याची कोणतीही घोषणा नाही

आरबीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही

सोशल मीडियावरही व्हिडीओ दिशाभूल करणारा

सोशल मीडियावर कुणीही काहीही व्हिडिओ बनवून व्हायरल करतो...सध्या प्लास्टिकच्या नोटा येणार असल्याची चर्चा आहे...पण, अचानक म्हणजेच 30 जूनपासून कागदी नोटा बंद होणार आणि प्लास्टिकच्या नोटा येणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com