Viral Video: छातीत गोळी अन् डोळ्याखाली पट्टी, तरीही आंदोलनात उभा राहिला तरूण; व्हिडीओ

Nepal Video: नेपाळमध्ये सोशल मिडियावर बंदी घालण्यात आली असून त्यामुळे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. संसदेवर हल्ला, आगजनी आणि गोळीबारामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.एका जखमी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

नेपाळमध्ये सोशल मिडियावर बंदी घालण्यात आली यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. असंख्य तरूणाईंनी विरोध करत निदर्शने काढली. आक्रमक झालेल्या तरूणांनी संसदेवर हल्ला केला आणि आग लावली. दरम्यान तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर होत गेली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. छातीला गोळी लागली असूनही हा तरूण माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

Viral Video
Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

सोशल मिडिया इन्स्टाग्राम @satish_khatri224 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहे. तरूणाच्या शर्टची बटणे उघडी आहेत. त्याच्या छातीवर जखम झाली आहे. तरूणाच्या हातात माईक आहे. जोरजोराड ओरडून हा तरूण संपूर्ण जमावाला एकत्रित येण्याचे आवाहन करत आहे. जेन- झी यांच्या समर्थनार्थ निर्दशने आहेत. तरूणाच्या हातात रक्तबंबाळ झालेला टिशर्ट दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या तरूणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका युजरने' तू आमचे धाडस आहेस, तुला पाहून आम्हाला धाडस मिळते! तू लाखो लोकांची मने जिंकली आहेस. मला तुझा आणि तुझ्या शब्दांचा खूप अभिमान आहे जे अधिक लोकांना जागे होण्यास प्रेरणा देतात. ' असं म्हटलं आहे.

Viral Video
Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमध्ये गोळीबारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये बहुतेक १८ ते ३० वयोगटातील तरुण आहेत. सुमारे ४०० हून अधिक तरुण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे निदर्शन दडपण्यासाठी जितके प्रयत्न केले जात आहेत तितके ते हिंसक होत आहे. आता जखमी तरुणही लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यावर येत आहेत आणि त्यांना पाहून निदर्शकांचा राग आणखी वाढत आहे.

Viral Video
Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com