
शिक्षणाला वयाची अट नसते. कोणत्याही वयात आपण शिक्षण घेऊ शकतो. नुकतंच सरकारी नोकरी करत असलेले चार जणांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. उत्तरांखड येथे मुक्त विद्यापीठाची बी. एड परिक्षा पार पडली. या परिक्षेसाठी हे चारही जण हेलिकॉप्टरने पोहचले होते.
मागील अनेक दिवसांपासून उत्तराखंड येथे मुसळधार पावसामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन होत आहे. डोंगरांना भेगा पडल्या आहेत. यामुळे रस्ते देखील बंद करण्यात आले अशातच नुकतंच बी. एड. ची परिक्षा देण्यासाठी चौघे हेलिकॉप्टरने पोहचावे लागले. वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांनी हा पर्याय निवडाला असे सांगितले आहे. त्यांनी हल्द्वानी मुन्सियारी हेलिकॉप्टर सेवा चालवणाऱ्या कंपनीशी संपर्क केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरट जाट, मगरम जाट, प्रकाश गोदरा जाट आणि लकी चौधरी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही उत्तराखंड मुक्त विद्यापीठातून बी. एड. चे शिक्षण घेत आहेत. दरम्यान या चौघांनाही उत्तराखंड मुक्त विद्यापीठाच्या बी. एड सेमिस्टर परिक्षेत भाग घेण्यासाठी मुनसियारी केंद्रावर पोहचावे लागले. वर्ष वाया जाऊ नये म्हणून हे चौघेही हेलिकॉप्टरने परिक्षा स्थळी पोहोचले आहे. त्यांच्या परीक्षा आर. एस. टोलिया पीजी कॉलेज मुनसियारी येथे होत्या.
ओमराट जाट या विद्यार्थ्यांने सांगितले कीस ३१ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे पोहचलो तेव्हा आम्हाला कळाले की मुनस्यारी येथे जाणारे रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहे. यामुळे आम्ही परीक्षा स्थळावर पोहचू शकणार नाही. यावेळी आम्हाला हल्दानी ते मुनसियारी दरम्यान एव्हिएशनच्या हेलिकॉप्टर सेवेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही कंपनीच्या सीईओशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की जर आमची परीक्षा चुकली तर आमचे एक वर्ष वाया जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.