Viral Video
Viral Video Saam Tv

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

Jaipur hotel fighting Video:जयपूरच्या आरटीडीसी पडाव हॉटेलमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात तुफान भांडण झाले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on

सोशल मीडियावर हाणामारीचे अनेक व्हिडीओ समोर येतात. हॉटेल, रेल्वे अशा विविध ठिकाणी भांडणे होतात. अनेकदा ही भांडणे इतकी टोकाला जातात यामुळे गंभीर इजा होऊ शकते . सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जयपूरच्या आरटीडीसी पडाव येथील हॉटेलमध्ये तुफान हाणामारी झालेली दिसतेय. दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली आहे. नेमके या भांडणाचे कारण काय हे समजू शकले नाही.

 Viral Video
Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

जयपूरच्या आरटीडीसी पडाव हॉटेलमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये भांडण झाले आहे. सुरूवातीला बाचाबाची झाल्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहचला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉटेलच्या बाहेर हा वाद झाला आहे. यामध्ये महिला व पुरूष एकमेकांवर धावून जात आहेत. महिला देखील मारताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील हा वाद आहे. एक कुटुंब जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. मात्र सुरूवातील काही कारणावरून त्यांची कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. नंतर हे प्रकरण टोकाला पोहचले आणि या दोघांमध्ये मारामारीला सुरूवात झाली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नेमका हा वाद कशामुळे पेटला आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या अ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 Viral Video
Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com