Road Accident Video: भरधाव कारची धडक; मुली थेट हवेत उडाल्या, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Mumbai Road Accident Viral Video: मुंबईतील भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
Mumbai Road Accident Viral Video
Mumbai Road Accident Viral VideoSaam Tv

मुंबईतील भीषण रस्ता अपघाताचा (Mumbai Road Accident) व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या मुलींना धडक दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघाताचा व्हिडिओ (Mumbai Road Accident Viral Video) समोर आला आहे.

ही घटना (Mumbai Accident) मुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत. दरम्यान, दोन मुली आणि एक मुलगा रस्ता ओलांडू लागले. मुलींनी रस्ता (Road Accident) ओलांडण्यासाठी पाऊल टाकताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली आहे. त्यामुळे या मुली हवेत उडाल्या आणि खाल्या पडल्या आहेत.

या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या ( Road Accident Video) आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. मुली जखमी झाल्याचं पाहून कारचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. या अपघातातील कारबाबत अद्याप कोणतीही माहिती (viral news) मिळालेली नाही.

Mumbai Road Accident Viral Video
Beed Accident News : मालवाहू गाडी- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील एका भावाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

ऐशानी जाधव (१४) आणि जान्हवी कनोजिया (१४) अशी जखमी मुलींची (viral video) नावे आहेत. दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बालहक्क संरक्षण आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा याही जखमी मुलींची भेट (Road Accident Viral Video) घेतली आहे.

Mumbai Road Accident Viral Video
Viral Accident Video: भरधाव दुचाकीला निलगायीची धडक.. शिंग तरुणाच्या छातीत घुसले; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com