Viral Accident Video: भरधाव दुचाकीला निलगायीची धडक.. शिंग तरुणाच्या छातीत घुसले; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Viral Video News: एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निलगायीच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
Viral Video News:
Viral Video News: Saamtv

स्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी, प्राण्यांनी हल्ला केल्याच्याही घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निलगायीच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अयोध्या-रायबरेली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इनायत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठे गाव सोसायटीसमोर दुचाकीस्वार तरुणाची नीलगायीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार 28 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरीकडे नीलगायीचाही मृत्यू झाला आहे.

नीलगाईच्या धडकेनंतर (Accident) शिंग थेट तरुणाच्या छातीत घुसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या असून तरुणाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

Viral Video News:
Jalgaon Temperature : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांवर

व्हायरल होत असलेल्या (Viral Video) व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकीस्वार तरुण रस्त्याच्या डाव्याबाजूने जात आहे. अशातच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक नीलगाय धावत डिव्हाडरवरुन उडी मारुन येते. डिव्हाडरवरुन उडी मारल्यानंतर गाईची दुचाकीला थेट धडक बसते. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार तरुण काही फुटांवर दूर जाऊन पडतो. ज्यामध्ये त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेवर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी अशा प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Viral Video News:
Maharashtra Lok Sabha Election Phase 1 : चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या मतदान, पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com