Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारमधून प्रवासी हवेत फेकले गेले, २ जागीच ठार

Samruddhi Mahamarg Accident News : सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होते. त्यावेळी वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. कार भरधाव वेगात आली आणि थेट महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून पलटी झाली.
Accident News
Accident NewsSaam TV

अभिजीत सोनवणे

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात वाहनातील २ जण जागीच ठार झालेत. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.

Accident News
Akkalkuwa Accident : मालवाहू गाडी नदीत कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होते. त्यावेळी वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. कार भरधाव वेगात आली आणि थेट महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून पलटी झाली. त्यात कारमधील सर्व व्यक्ती बाहेर हवेत फेकल्या गेल्या.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अपघातात बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच मृत पावले. तर निशा रामकिसन गडगूळ (वय-२०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. वाहन चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ, मिनाबाई रामकिसन गडगूळ जखमी आहेत.

अपघात झाला तेव्हा रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहन देखील रस्त्यातून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

बसच्या चाकामध्ये पाय अडकून महिलेचा मृत्यू

आज पुण्यामध्ये देखील एक अपघाताची घटना घडली आहे. पीएमपी बसच्या चाकामध्ये पाय अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ही घटना घडली. काशीबाई खुंरगळे असं मृत महिलेचं नाव आहे.

महिला सोमवारी दुपारी पीएमपी बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये पाठीमागील दरवाजातून जात असताना तिचा पाय चाकामध्ये अडकला. यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवली. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Accident News
Crime News: बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश.. ९ लाख रुपयांसह तब्बल १२ तोळे सोने लंपास; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com