Akkalkuwa Accident : मालवाहू गाडी नदीत कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर

Nandurbar News : पिंपळखुटा ते गमनचा उमरपाडा रस्त्यावर गाडी भरधाव वेगात गाडी असल्याने चालक कैलास पाटील याचे नियंत्रण सुटले
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam tv

नंदुरबार : मालवाहू गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट नदीत कोसळल्याची घटना (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा उमरपाडा येथे घडली. या अपघातात (Accident) दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

Nandurbar Accident
Zomato Delivery : झोमॅटोच्या माध्यमातून दारू विक्रीचा अजब प्रकार; संभाजीनगरात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नाशिक (Nashik) येथील कैलास सुरेश पाटील हे गाडीवर मजूर घेऊन अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथे जात होते. पिंपळखुटा ते गमनचा उमरपाडा रस्त्यावर (Nandurbar) गाडी भरधाव वेगात गाडी असल्याने चालक कैलास पाटील याचे नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट देवनदीच्या खाडीत पडली. यात राजू ओंकार बारेला (वय ३०, रा. कर्जाना, ता. चोपडा, जि. जळगाव) व पोपट दत्तू सोनवणे (वय ४०, रा. नाशिक) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Accident
Pune News : गाडीच्या कारणावरून वडील रागावले; नववीतील मुलाने उचलले टोकाच पाऊल

चालक कैलास पाटील (रा. नाशिक) याच्यासह ज्ञानेश्‍वर उत्तम वाघ (रा. कुंजर, ता. चाळीसगाव), सुनील बड्या पावरा (रा. खर्डी खुर्देचा पाटीलपाडा, ता. धडगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले. घटना घडताच नागरिकांनी धाव घेत मदतीला सुरवात केली. तसेच मोलगी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. जखमींना तत्काळ उपचारासाठी अक्कलकुवा येथे पाठविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालक कैलास पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com