maharashtra lok sabha polls 2024 phase 1 tommorow voting in chandrapur constituency
maharashtra lok sabha polls 2024 phase 1 tommorow voting in chandrapur constituencySaam Digital

Maharashtra Lok Sabha Election Phase 1 : चंद्रपूर लोकसभेसाठी उद्या मतदान, पथके साहित्यासह केंद्राकडे रवाना

Chandrapur Lok Sabha Election 2024 : उन्हाचा तडाका लक्षात घेता सुमारे 11,242 ओआरएस पाकिटे देखील मतदान कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत अशी माहिती संजय वामन पवार (उपविभागीय अधिकारी) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Chandrapur Lok Sabha Election 2024 :

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उद्या (ता. 19 एप्रिल) मतदान हाेणार आहे. त्यासाठी विविध विधानसभा मतदारसंघ स्थळावरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान पथके साहित्यासह आपापल्या बसमध्ये बसून रवाना होण्यास प्रारंभ झालाय. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण 2118 मतदान केंद्रांवर 9322 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

maharashtra lok sabha polls 2024 phase 1 tommorow voting in chandrapur constituency
Unseasonal Rain Hits Wardha: गारपिटीच्या तडाख्यात शेत शिवार, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात अश्रु; मदतीसाठी कार्यवाही सुरु : धनंजय मुंडे

या सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य रक्षण व तापत्या उन्हापासून संरक्षणासाठी उपाययोजना उभारण्यात आल्या आहेत. यासह सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 196 पडदा मशीन विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

6 दिव्यांग व्यवस्थापित, 6 महिला व्यवस्थापित, 6 युवा मतदान केंद्र, तर 6 आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 11,242 ओआरएस पाकिटे देखील मतदान कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत अशी माहिती संजय वामन पवार (उपविभागीय अधिकारी) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

maharashtra lok sabha polls 2024 phase 1 tommorow voting in chandrapur constituency
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com