Pandharpur Viral Video: पंढरीत चमत्कार घडला! एका व्हायरल रिलमुळे दीड वर्षांनी हरवलेली 'माऊली' सापडली; माय-लेकाच्या भेटीची हृदयस्पर्शी स्टोरी, वाचा...

Missing Mother in Found in Pandharpur Viral Video: पंढरपुरात काढलेला एक छोटासा व्हिडिओ अन् मुंबईतील एक हरवलेली माऊली दीड वर्षांनी सापडली. विठुरायाचा चमत्कार की योगायोग? काळजाला भिडणारी ही ह्रदयस्पर्शी स्टोरी वाचून डोळे पाणावतील.
Pandharpur Viral Video: पंढरीत चमत्कार घडला! एक रिल अन् दीड वर्षांनी हरवलेली 'माऊली' सापडली; माय-लेकाच्या भेटीची ह्रदयस्पर्शी स्टोरी, वाचा...
Missing Mother in Found in Pandharpur Viral Video:Saamtv
Published On

पंढरपूर, ता. २१ जुलै २०२४

अनाथांचा नाथ, गोर-गरिबांचा कैवारी अन् वाट चुकलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवणारा रोडमॅप म्हणजे पंढरीचा विठुराया. दरवर्षी लाखो वारकरी तहान, भूक विसरुन, कित्येक किलोमीटर पायी प्रवास करुन लाडक्या विठुराया अन् रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी पंढरीत दाखल होतात.

असं म्हणतात की या वारीत चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा, अनाथांना आधार देण्याचे काम विठुराया करतो. याचीच प्रचिती यंदाच्या वारीत आली अन् एका छोट्याशा रिलमुळे दीड वर्षांपूर्वी मुंबईतून हरवलेली माऊली पंढरपूरात सापडली. नेमकी काय आहे ही काळजाला चटका लावून जाणारी स्टोरी? वाचा सविस्तर

काय आहे संपूर्ण स्टोरी?

१७ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये महाराष्ट्रासह राज्यभरातील वारकऱ्यांनी गर्दी केली होती. लाखो भाविकांच्या अलोट गर्दीने विठुरायाची पंढरी अगदी गजबजून केली होती. याच वारीत शिवाजी धुते नावाचे एक फोटोग्राफरही विठुरायाच्या दर्शनाला आले होते. आषाढी वारीत फिरताना विविध फोटो, सुंदर क्षण, भक्तीत रमलेल्या वारकऱ्यांचे फोटो ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.

रेनकोट विकणाऱ्या मुलाचा संघर्ष

याच गर्दीत एक रेनकोट विकणारा चिमुकला त्यांच्या नजरेस पडला. २० रुपयांचे रेनकोट विकून पैसे मिळवण्याची धडपड, भर पावसात त्याचा सुरू असलेला संघर्ष त्यांच्या मनाला भावला अन् त्याचा संघर्ष आपल्या व्हिडिओतून मांडण्याचा विचार त्यांच्या मनात आला. याच विचारातून त्यांनी एक रिल शूट केला. याच एका रिलमध्ये एक माऊली कैद झाली, ज्यानंतर पुढे जे घडलं ते अगदी अविश्वसनीय होतं.

Pandharpur Viral Video: पंढरीत चमत्कार घडला! एक रिल अन् दीड वर्षांनी हरवलेली 'माऊली' सापडली; माय-लेकाच्या भेटीची ह्रदयस्पर्शी स्टोरी, वाचा...
Maharashtra Politics : 'मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' अखेर तो क्षण आलाच!

व्हिडिओ व्हायरल झाला अन्..

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजी धुते यांना मुंबईमधून एक फोन आला. ज्यामध्ये एका मुलाने त्या व्हिडिओमध्ये कैद झालेली महिला आपली आई असल्याचे सांगितले. त्यानंतर हा व्हिडिओ शूट कुठे केला? कशी शूट केला? याबाबतची चर्चा झाली अन् पंढरपुरमध्ये शोधाशोध सुरू झाली.

दीड वर्षांनी हरवलेली माऊली सापडली!

आता लाखो भाविकांच्या गर्दीतून ही रिलमधील माऊली शोधायची कशी? असा प्रश्न होता. पण माऊलीचं नाव घेऊन शोध मोहिम सुरू झाली अन् चमत्कार बघा, अवघ्या काही तासात चंद्रभागेच्या काठावर ती माऊली सापडली. अगदी चित्रपटाच्या कथेला अशी ही खरीखुरी स्टोरी ऐकून नेटकरीही थक्क झालेत.

Pandharpur Viral Video: पंढरीत चमत्कार घडला! एक रिल अन् दीड वर्षांनी हरवलेली 'माऊली' सापडली; माय-लेकाच्या भेटीची ह्रदयस्पर्शी स्टोरी, वाचा...
Viral Video : रिल्स,फोटोचं वेड काही जाईना! नदीकाठी रिस्क घेत तरुणांचं फोटोसेशन; पाहा VIDEO

विठुरायाचा चमत्कार की योगायोग?

एवढ्या लाखोंच्या गर्दीत त्या चिमुकल्याचा व्हिडिओ काढणं, तो मुलगा त्या माऊलीकडे सुट्टे पैसे घेण्यासाठी धावणं अन् व्हिडिओ व्हायरल होऊन मुंबईपासून पंढरपुरपर्यंत शोधमोहिम सुरू होऊन लाखोंच्या गर्दीत ही माऊली सापडणं म्हणजे निव्वळ योगायोग नव्हे विठुरायाचीच कृपा आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Pandharpur Viral Video: पंढरीत चमत्कार घडला! एक रिल अन् दीड वर्षांनी हरवलेली 'माऊली' सापडली; माय-लेकाच्या भेटीची ह्रदयस्पर्शी स्टोरी, वाचा...
Mumbai Local Train AI Photos: धो धो कोसळणाऱ्या पावसात मुंबई लोकल ट्रेन कशी दिसते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com