Mumbai Rain Updates : मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पुन्हा पाण्याखाली; रस्ते वाहतूक मंदावली

IMD Heavy Rainfall Alert in Mumbai : शनिवारी रात्री मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, रविवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे.
IMD Heavy Rainfall Alert in Mumbai
IMD Heavy Rainfall Alert in MumbaiSaam TV
Published On

मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर शनिवारी रात्री मुंबईत पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, रविवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला. अंधेरी सब-वेवर पाणी साचल्याने भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली.

IMD Heavy Rainfall Alert in Mumbai
Weather Alert : महाराष्ट्रासह देशातील ५ राज्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. मात्र, आज रविवार असल्याने बऱ्याच कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे अनेकजण घरी बसूनच सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने कमी असल्याने तेवढा परिणाम जाणवलेला नाही.

प्राप्त माहितीनुसार, किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला या ठिकाणी रविवारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्याशिवाय अंधेरी सबवे येथेही पाणी साचले होते.

त्याचबरोबर कुर्ला एलबीएस रोड परिसरातही पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. मिलन सबवे येथेही शनिवारी रात्री अपघात झाल्यामुळे येथील वाहतुकीचा वेग देखील मंदावला होता. दुसरीकडे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला.

नवी मुंबईतील, सीबीडी बेलापूर, वाशी, सानपाडा परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होण्याआधीच मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती.

त्यामुळे मेगाब्लॉकआधी महत्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी सकाळच्या सत्रात मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत्या होत्या. येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा आणखीच जोर वाढणार असून नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

IMD Heavy Rainfall Alert in Mumbai
Mumbai Local Train : मुंबईकरांचा भल्यापहाटे खोळंबा, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com