ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साबुदाणा, उकडलेले बटाटे, मीठ, जिरं, हिरवी मिरची, तुप.
सर्वप्रथम एक वाटी साबुदाणे घेऊन ते मंद आचेवर भाजून घ्या.
त्यानंतर साबुदाणे थंड झाल्यावर मिक्सरमधून साबुदाणे बारीक करून त्याचे पीठ तयार करा.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे,जिरं, मीठ आणि बारीक चिरलेली मिरची टाकून निट मिक्स करून घ्या.
तयार मिश्रणात साबुदाण्याचे पीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा आणि पीठ मळून घ्या.
पीठाचे गेळे करून त्याचे पराठे तयार करा. त्यानंतर गरम पॅनवर पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.
तयार पराठ्यांना तूप लाबून दही सोबत उपवासाचे खमंग पराठे सर्व्ह करा.