Mumbai Railway: रेल्वे ट्रॅकवरच थाटलाय संसार, मुंबईतल्या रेल्वे स्टेशनजवळील VIDEO व्हायरल

Viral Video Of Mumbai Railway: मुंबईकरांसाठी रेल्वे ही खूप महत्त्वाची आहे. दररोज लाखो मुंबईकर ट्रेनने प्रवास करतात. रेल्वेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा लोक जीवाची बाजी लावून ट्रेनमध्ये चढतात. परंतु आता लोकांना रेल्वे ट्रॅकवरच संसार थाटला आहे.
Mumbai Railway Track
Mumbai Railway TrackSaam Tv
Published On

Viral Video Of Mahim Junction Railway Track:

मुंबईकरांसाठी रेल्वे ही खूप महत्त्वाची आहे. दररोज लाखो मुंबईकर ट्रेनने प्रवास करतात. रेल्वेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा लोक जीवाची बाजी लावून ट्रेनमध्ये चढतात. परंतु आता लोकांना रेल्वे ट्रॅकवरच संसार थाटला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईत लोक वेगवेगळ्या राज्यातून पैसे कमावण्यासाठी येतात. अनेकदा तर रस्त्यावर झोपडी बांधून, कधी रेल्वे ट्रॅकवर, प्लॅटफॉर्मवर राहतात. तिथेच झोपतात. असाच एक रेल्वे ट्रॅकवर राहणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ माहिम जंक्शनचा आहे. या व्हिडिओत अनेक लोक रेल्वे ट्रॅकवर बसलेले दिसत आहेत. त्यात अनेक लोक जेवण बनवताना दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर अनेक लहान मुले धावताना, खेळताना दिसत आहे. तर रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला अनेक लोक झोपलेले दिसत आहेत. तसेच अनेक लोकांना रेल्वे ट्रॅकवर कपडे वाळत घातले आहेत आणि त्याच्या आजूबाजूला बसलेले दिसत आहे. माहिम स्टेशनवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Railway Track
Gautami Patil Video: तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? अतरंगी मीम्स व्हिडीओ व्हायरल

'चोर, गुन्हेगार, दहशतवादांची नवीन कॉलनी तयार होत आहे'. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. मुंबई पोलिस, बीएमसीला टॅग करत कारवाई करण्यास सांगितले आहे.Aamchi Mumbai या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हे खूप जास्त घातक आहे, रेल्वे ट्रॅक आहे की घर.., लहान मुलांसाठी फारच धोकादायक आहे, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Mumbai Railway Track
Viral Video: व्वा क्या बात है! बांगड्या विकणाऱ्या महिलेनं फाडफाड इंग्रजी झाडलं; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com