Mumbai Local Fight : मुंबईची लोकल बनली WWE चा आखाडा; प्रवाशांमध्ये कुटाकुटी, VIDEO व्हायरल

Local Fight : मुंबई लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये अचानक बाचाबाची झाली अन् बघता बघता हाणामारीपर्यंत पोहोचले. एकमेकांना धक्काबुक्की आणि ठोसे मारतानाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai Local Fight : मुंबईची लोकल बनली WWE चा आखाडा; प्रवाशांमध्ये कुटाकुटी, VIDEO व्हायरल
Mumbai Local Fight : मुंबईची लोकल बनली WWE चा आखाडा; प्रवाशांमध्ये कुटाकुटी, VIDEO व्हायरलmeta ai
Published On

मुंबईच्या लोकलची गर्दी म्हटली की काळजात धडकी भरते. यामुळं चीडचीड, राग, संतापानं प्रवाशाचा चेहरा आधीच लालबूंद असतो. त्यात संयम, सहनशक्तीही कमी झालेली आहे. मग थोडा जरी कुणाचा धक्का लागला की लालबूंद रागाने भरलेल्या चेहऱ्यामागे दडलेला रागीट, तापट माणूस जागा होता आणि मग ट्रेनच्या डब्याचा थेट WWE चा आखाडा होतो. प्रवाशांमध्ये शिवीगाळ होते, मग थेट हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचतं. असाच एक मुंबईच्या लोकलमधील फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुटाकुटीचं दृश्य अन् पब्लिक

लोकलमधून प्रवास करताना ज्याने त्याने शिंगावर माती घेतलेली असते. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसतोय. ट्रेनमध्ये गर्दी दिसतेय. दोघे जण एकमेकांना धक्काबुक्की करत आहेत. एक तर थेट WWE च्या रिंगमधला रेसलरच दिसतोय. तो दुसऱ्या प्रवाशाला एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसासारखा बुक्क्या मारताना दिसतोय. काही प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. तर त्यांच्या बाजूलाच असलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Local Fight : मुंबईची लोकल बनली WWE चा आखाडा; प्रवाशांमध्ये कुटाकुटी, VIDEO व्हायरल
एसटी बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही; पठ्ठ्यानं असा जुगाड केला की हसावं की रडावं कळेना! VIDEO Viral

https://youtu.be/BdEzjiYKbe8?si=-tGGY37osyu2YS33मुंबईची जीवनवाहिनी होतेय जीवघेणी...

मुंबईच्या लोकलची खासियत म्हणजे तिला जीवनवाहिनी म्हटलं जातं. पण भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, ट्रेनची संख्या कमी यामुळं गर्दीची लोकल अशी तिची हळूहळू ओळख झाली आहे. पहाट असो की सकाळ, दुपार असो की रात्र...गर्दी हमखास ठरलेली. मग यामुळं गर्दी आणि चीडचीड. बसायला जाऊ द्या हो, पण उभं राहणंही कठीण झालेलं आहे. उभं तरी कशाला, पाय ठेवायलाही जागा नसते. मग कधी सीटवरून, कधी धक्का लागला तरी एखाद्याचा पारा लगेच चढतो आणि तो तर भांडणावरच येतो. बाचाबाची झाली अन् चूक कोणाची तुझी की माझी, यावरच हा वाद थांबत नाही. कधी-कधी तर भांडखोर लोक थेट हाणामारीवरच येतात. काही काही तर इतके विक्षिप्त असतात की लोकलमध्ये चढतानाच हाताचे दोन्ही कोपरे दणादण मारत सुटतात. कोण कोणाची कॉलर धरतो, कोण शिवीगाळ करतो तर कोण माजुरडेपणा दाखवतो. आता ही जीवनवाहिनी जीवघेणी झाली आहे, अशा शब्दांत काही प्रवासी प्रतिक्रिया देतात. तर ट्रेनमधल्या या गर्दीत आता जीव घुसमटतोय, असंही काही प्रवासी बोलू लागले आहेत. या गर्दीतून सुटका कधी होणार, असाच प्रश्न आहे.

Mumbai Local Fight : मुंबईची लोकल बनली WWE चा आखाडा; प्रवाशांमध्ये कुटाकुटी, VIDEO व्हायरल
Mumbai : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; केस ओढले, चापटा मारल्या अन्... ; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या दोन प्रवाशांमध्ये नेमका वाद कशावरून झाला, ही घटना नेमकी कधी आणि कोणत्या लोकलमध्ये घडली, कुठे घडली याबाबतचा तपशील कळू शकलेला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याची पडताळणीही झालेली नाही.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com