मुंबई विमानतळाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबई विमानतळावर एकाचवेळी धावपट्टीवर दोन विमाने असल्याचे दिसत आहे. यातील एक विमान लँड होत आहे तर दुसरं विमानात आकाशात उड्डाण घेत आहे. एकाचवेळी दोन विमाने धावपट्टीवर असणे धोकादायक ठरु शकते. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजे ९ जून रोज सकाळी ही घटना घडली आहे. मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विमाने एकाच धावपट्टीवर दिसत आहे. या विमानांची धडक थोडक्यात चुकली आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. याप्रकरणी डीजीएस यांनी तातडीने कारवाई सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरहून आलेल्या इंडिगोच्या वएका विमानाला मुंबई विमानतळावरील एका एअर ट्राफिक कर्मचाऱ्यांनी लँडिंगची परवानगी दिली होती. मात्र, हे विमान एका बाजूने लँड होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूने एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताना दिसत आहे. सुदैवाने या दोन्ही विमानांटची टक्कर झाली नाही.
एकाच धावपट्टीवर एक विमानाचे लँडिंग आणि टेक ऑफ एकाचवेळी होताना दिसत आहे. या दोन्ही विमानांमध्ये फार अंतर नव्हते. जर चुकूनही एअर इंडियाच्या विमानाला टेक ऑफ घेण्यासाठी उशीर झाला असता तर दोन विमांनाची नक्कीच धडक झाली असती. यात अनेक प्रवाशांना नुकसान पोहचले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबई विमानतळावरील या घटनेने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, जर चुकूनही दोन्ही विमानांची धडक झाली असती तर विचारही करता येत नाही, अशा कमेंट्स आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.