Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा! रस्त्यावर पावसाचं पाणी भरलं, अन् पठ्ठ्यानं त्यातच पोहायला सुरूवात केली

Pune Rain Viral Video: पुण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर फ्लोटिंग करताना दिसत आहे.
Pune Rain Viral Video
Viral Video Saam TV

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आशा वातावरणात पुण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर फ्लोटिंग करताना दिसत आहे.

Pune Rain Viral Video
Times Square Viral Video: सातासमुद्रापार सुप्रिया सुळेंची चर्चा! टाईम्स स्क्वेअरवर झळकले विजयाचे बॅनर; VIDEO VIRAL

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे अनेक नागरीक त्रस्त झाले होते. पावसांच्या आगमनामुळे नागरीकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

संपूर्ण परिसरात आणि वातावरणात थंडावा पसरला आहे. प्रत्येक जण पावसाचा आपापल्या परीने आनंद घेताना दिसत आहे. पावसाळ्यची मजा नागरीकच नाही तर अनेक पशु पक्षी देखील घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर पावसाळ्यातील मौज-मजेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गेले काही दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या देखील पहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याचे दिसून येते. एकीकडे पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे पुणेकर पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पुण्यातील येरवडा परिसरातील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या शीटच्या, थर्माकॉलच्या साहाय्यने पावसाच्या पाण्यात फ्लोटिंग करताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध गाड्यांमध्ये हा तरुण पावसाचा आनंद लुटतोय. गाड्यांना पुढे जाण्याचा इशारा करत हा तरुण स्वतःमात्र पाण्यात तरंगत आहे.

हा व्हिडीओ @mipunekar.in या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'कशी वाटली भावाची शक्कल? असे मजेशीर कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

कोणी बोलतं की, 'पोहत पोहत डायरेक्ट येरवड्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलध्ये जा.' तर कोण बोलत की, डायरेक्ट येरवड्यातील जेलमध्ये पोहचशील भावा' अशा मजेशीर कमेंट्स नेटकरी करत आहेत. पुण्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Pune Rain Viral Video
Husband-Wife Fight Video: सासूने सुनेसमोरच सासऱ्याला दाखवला इंगा; चक्क पळवून पळवून मारले; VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com