ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनवेलजवळ असलेला कर्नाळा किल्लाला पर्यटक पावसाळ्यात आवर्जून भेट देतात.
खोपोली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पळसदरी या ठिकाणाला तुम्ही पावळ्यात अवश्य भेट द्या.
कल्याण- मुरबाड महामार्गाजवळ असलेला माळशेज घाटला पावसाळ्यात लाखो पर्यटक भेट देत असतात.
कर्जत जवळच असलेला भिवपुरी धबधबा अनेक पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनलेला आहे.
बदलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. प्रत्येक पावसाळ्यात अनेक पर्यंटक येथे येत असतात.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला माथेरान पावसाळ्यात पर्यटनासाठी विशेष ओळखला जातो.
लोणावळ्यातील भुशी डॅम म्हणजे पर्यटकांसाठीच वर्गणीच ठरते. प्रत्येक पावसाळ्यात असंख्य लोक येथे जात असतात.
पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे शिवाय पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यात जाणे.