Moye Moye Omelette: ऑमलेटमध्ये पार्लेजी बिस्कीट टाकलं अन् मोये मोये झालं; स्ट्रीट फूडचा VIDEO व्हायरल

Buiscuit Omelette Video Viral: प्रत्येक पदार्थाची स्वतःची एक वेगळी चव असते. बेचव जेवण कुणालाही आवडत नाही. मात्र आजकाल कोणत्या पदार्थात दुसरा एखादा कोणताही पदार्थ मिक्स करून खण्याचं ट्रेण्ड सुरू
Moye Moye Omelette
Moye Moye OmeletteSaam TV
Published On

अक्षय बडवे

Omelette With Parle G Biscuit:

स्ट्रीट फूड खायला सर्वांनाच आवडतं. त्याने शरीरावर कितीही वाईट परिणाम होऊ द्या, प्रत्येक व्यक्ती महिन्यातून एकदा तरी स्ट्रीट फूटने आपल्या जिभेचे चोचले पुरवतो. अशात सोशल मीडियावर एका ऑमलेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडीओला मोये मोये ऑमलेट असं नाव दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Moye Moye Omelette
Free Food Grains: गरिबांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य

प्रत्येक पदार्थाची स्वतःची एक वेगळी चव असते. बेचव जेवण कुणालाही आवडत नाही. मात्र आजकाल कोणत्या पदार्थात दुसरा एखादा कोणताही पदार्थ मिक्स करून खण्याचं ट्रेण्ड सुरू आहे. यातील काही पदार्थ असेही आहेत ज्यांची रेसिपी ऐकून तुम्ही ते पदार्थ खाणं सोडून द्याल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक व्यक्ती ऑमलेट विकत आहे. प्रत्येक नॉनव्हेज प्रेमी व्यक्तींसाठी ऑमलेट फेवरेट डिश आहे. कांदा, टोमॅटो, मसाला, मीठ टाकलेल्या ऑमलेटची चवच न्यारी असते. मात्र एका व्यक्तीने या ऑमलेटची पार वाट लावलीये. ऑमलेट बनवताना त्या मिश्रणात व्यक्तीने पर्लेजीची बिस्किटे टाकलीत.

बिस्कीटांसह त्याने ऑमलेट मस्त फ्राय केलं आहे. आता या ऑमलेट रेसिपीचा एक व्हिडिओ तरुणाने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ त्याने @foodb_unk या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय. तसेच कॅप्शनमध्ये मोयेमोये ऑमलेट असं लिहिलं आहे.

असे पदार्थ तर कुत्रे सुद्धा खाणार नाहीत अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. यासह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त करत अनेक कमेंट केल्यात. यातील काही कमेंटतर फार हस्यास्पद आहेत. सोशल मीडियावर चमचमीत जेवणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा बेकरी फूड बनवताना केलेल्या अस्वच्छतेचेही व्हिडीओ समोर आलेत. मात्र सध्या ऑमलेटच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

Moye Moye Omelette
Mumbai Crime News : नैराश्यामुळं तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल; 14व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com