Mosquito Burger: मच्छरांचा बर्गर खालाय का? भरपूर प्रोटीन असलेला मॉस्कीटो बर्गर कुठे मिळतोय?

Mosquito Burger In Africa: चीनमध्ये वटवाघूळ देखील खाल्ल जातं. तर अफ्रिकेमध्ये काही व्यक्ती अशी गोष्ट खात आहेत ज्याचा आपण कधीही विचार केला नसेल.
Mosquito Burger
Mosquito BurgerSaam TV
Published On

Africa News:

प्रत्येक देशानुसार, गावानुसार तेथील व्यक्तींच्या खाण्यापीण्याच्या सवयी वेगळ्या असतात. भारतात नॉनवेज प्रेमी चिकन, मटण, मासे खातात. मात्र भारताबाहेर विविध देशांमध्ये लोकांच्या चवी वेगवेगळ्या आहेत. चीनमध्ये वटवाघूळ देखील खाल्ल जातं. तर अफ्रिकेमध्ये काही व्यक्ती अशी गोष्ट खात आहेत ज्याचा आपण कधीही विचार केला नसेल. (Latest Marathi News)

अफ्रिकेच्या एका गावात मच्छरचा बर्गर बनवून खाल्ला जातोय. मच्छर किंवा माशी पकडणे फार कठीण असते. मात्र अफ्रिकेत एका गावात मच्छर टोप, पातेलं, तवा यांच्या सहाय्याने पकडले जात आहेत. एक दोन नाही तर अगदी एखाद्या बर्गरच्या आकाराऐवढा मच्छारांचा गठ्ठा गोळा केला जातो.

Mosquito Burger
Viral Video News: परीक्षेच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत मजा... तरुणाने बायकोला रंगेहाथ पकडलं अन्; व्हिडिओ तुफान व्हायरल

या व्यक्ती जमा केलेल्या मच्छरांना मारतात आणि तव्यावर बर्गर, वडी असे विविध आकार देत त्यांना तळून काढतात. सध्या मॉस्कीटो बर्गरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @thecompletefacts या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत मॉस्कीटो बर्गरची माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदीकाठावर खुप जास्त प्रमाणात मच्छर येतात. हे मच्छर इतके जास्त असतात की, यांच्या झुंडमुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यासही त्रास होईल. मच्छरांच्या या समस्येपासून आपला बचाव व्हावा म्हणून येथील नागरिकांनी त्यांना खाण्यास सुरुवात केली.

Mosquito Burger
Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं

आता येथील व्यक्ती मच्छरांचा हा बर्गर मोठ्या आवडीने खातात. मच्छरांचा बर्गर बनवण्यासाठी ते फक्त मच्छरांना तव्यावर फ्राय करतात आणि त्यावर मिठ टाकून खातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com