दुकानदार गाफील अन् चोर सराईत; मोबाईल चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Mobile Theft Video Kalyan: कल्याणच्या भांड्याच्या दुकानात मोबाईल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र पोलिसांनी चोरीऐवजी मोबाईल हरवल्याची नोंद घेतल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mobile Theft Video Kalyan
Kalyan NewsSaam Tv
Published On

कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलिस स्थानकाचा अजब कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सीसीटीव्हीत मोबाईल चोर स्पष्टपणे दिसूनही चोरीचा गुन्हा नोंदवण्याऐवजी पोलिसांनी मोबाईल हरवल्याची नोंद घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

कल्याण(Kalyan) पूर्वेतील गणेश मंदिर परिसरातील गणेश स्टील अँड नोवेल्टी या भांड्यांच्या दुकानात सुरेखा पाठारे या दुकानमालक १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आपल्या दुकानात होत्या. त्याचवेळी एक इसम ग्राहक बनून भांडी घेण्यासाठी आला. त्याने विविध भांडी दाखवण्याची मागणी करत सुरेखा यांचे लक्ष विचलित केलं. त्याच क्षणी संधी साधून दुकानात ठेवलेला मोबाईल फोन त्याने आपल्या उजव्या खिशात टाकून लंपास केला. काही वेळाने तो दुकानदाराच्या नकळत बाहेर निघून गेला.थोड्याच वेळात सुरेखा यांना मोबाईल दिसेनासा झाला.

त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार स्पष्ट दिसून आला. त्या तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्या आणि मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.मात्र पोलिसांनी केवळ “मोबाईल हरवला” अशी नोंद केली.या प्रकारामुळे आता कोळसेवाडी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सध्या हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे,''गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चालली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mobile Theft Video Kalyan
Viral Video : पिकअप आणि मिनी ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com