ना सायकल, ना रिक्षा… शाळेत थेट घोड्यावरून, सोलापूरमधील विद्यार्थ्याची हटके स्टाईल; VIDEO

Horse back To School: वैरागच्या आदर्श साळुंखेचा शाळेचा प्रवास सर्वांचं लक्ष वेधतोय. वाहनांची सोय नसल्याने तो रोज घोड्यावरून शाळेत जातो. शिक्षणावरील त्याची निष्ठा आणि जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरतेय.
Horse back To School
Saam Tv
Published On

काल मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी पायी,कधी दुचाकीवर, कधी रिक्षा,कधी स्कूलबस मध्ये तर कधी स्वतःच्या गाडीने शाळेत सोडावे जावे लागते. मात्र, वैरागमधील आदेश साळुंखे हा आपल्या शाळेत ना चालत,ना वाहनाने सरळ येतो तो घोड्यावरती येतो.रुबाबात येतो, रुबाबात शिकतो आणि रुबाबातच घरी जातो. त्याचीही घोड्यावरची स्वारी सर्वत्र चर्चेत असून आकर्षणही ठरू लागली आहे.

आजकाल शाळा(School) म्हटले की,सोयी सुविधा आल्याच.मग मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पायी, सायकल, स्कूलबस, रिक्षा स्वतःची चार चाकी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.मात्र, जे वाडी वस्तीवर राहतात त्यांना एक तर वाहन किंवा चालत येण्याशिवाय पर्याय नसतो अशापैकीच एक असलेल्या आदर्श साळुंखे हा विद्यार्थी वैराग पासून जवळ असलेल्या सावंत वस्तीमध्ये राहतो.

त्याच्या आजोबांकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडी देखील आहेत. त्यामुळे, जर शाळेत येण्यासाठी आदर्शला कोणतंच वाहन मिळालं नाही तर चक्क तो घोडा घेऊन शाळेत येतो. सध्या आदर्श साळुंखे वैराग येथील साधना प्रशालेमध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून रोज सातत्याने शाळेत येतो. यापूर्वी मुंबई- औरंगाबाद असा प्रवास केलेला असल्याने आदर्शला कोणत्याही परिस्थितीचा सामना करायची सवय लागली आहे.त्यामुळे शाळेला जाण्यास वाहन मिळाले तर ठीक नसेल तर आजोबा सांभाळत असलेल्या घोड्यांपैकी एक घोडा घेतो आणि सरळ शाळा गाठतो.घोडा हा मुळातच रुबाबदार प्राणी आणि त्याच्यावर बसणारा देखील रुबाबदार ठरतो. त्यामुळे घोड्यावर बसण्याची अनेकांना आवड आणि हौस असते मात्र हीच हौस दुसऱ्याची गरजही असते.

ह्याचे चित्र वैरागमध्ये आदेश साळुंखे यांच्याकडे बघितल्यानंतर कळते. या घोड्यावर तो शाळेत आल्यानंतर सवंगड्यांसाठी औत्सुक्याचा विषय तर असतोच पण रस्त्यावरून येता जाता पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटते. इयत्ता नववी मध्ये शिकणारा आदर्श केवळ घोड्यावरच शाळेत येतो असे नाही. आल्यानंतर त्याला शाळे शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली सावलीत बांधणे. त्याच्यासाठी चारा, त्याला पाणी पाजणे.आधी सेवा देखील तो करतो.हे सर्व कार्य तो शाळेच्या मधल्या सुट्टीत करतो हे विशेष आहे .

वस्ती वरती राहण्यास असल्यामुळे त्याला शाळेत येण्यासाठी घोडा महत्त्वाची भूमिका बजावतो. वाहनांची वाट न बघता घोडा घेऊन का येईना पण तो शाळेत येऊन रोज हजेरी लावत असल्यामुळे त्याची शिक्षणाबद्दल असलेली आवड यातून लक्षात येते. लांबच्या वस्तीवरून येणाऱ्या आदर्शच्या घोड्याबद्दल शाळेला कोणतीही अडचण नसून त्याने रोज शाळेत यावे एवढीच शाळेची अपेक्षा आहे. हुशार असलेल्या आदर्श कडून आम्हाला त्याची रोजची उपस्थिती महत्त्वाची आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Horse back To School
धावत्या रेल्वेच्या दारात स्टाईल मारत होती तरुणी; आई आली अन् धू धू धूतले; VIDEO VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com