Food Viral Video
Food Viral VideoSaam Digital

Viral Video: तरुणाने ऑर्डर केलं सॅलड अन् निघालं भलतंच...VIDEO पाहून नेटकरीही झाले हैराण

Shocking Viral Video:का व्यक्तीनेही ऑनलाईन फुड ऑर्डर केले होते मात्र ऑर्डर केलेले फुड जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला.
Published on

Food Viral Video

जगभर अनेक व्यक्ती तर सेंकदाला ऑनलाईन फुड ऑर्डर करत असतात. आपणही अनेकदा जेवन बनवण्याचा कंटाळा आला की ऑनलाईन फुड ऑर्डर करत असतो. ऑनलाईन फुड ऑर्डर करण्यासाठी अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार जेवण मागवत असतो. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनेही ऑनलाईन फुड ऑर्डर केले होते मात्र ऑर्डर केलेले फुड जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Food Viral Video
Viral Video: नदी स्वच्छतेची टेक्नॉलॉजी बघून आनंद महिंद्रा 'इम्प्रेस'; देशासाठी फायनान्स करण्याची दाखवली तयारी

अनेकवेळा मोठ्या मोठ्या हॉटेलमधून जेवणाच्या बाबतच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे हॉटेलमध्ये हाणामारी झाल्याचे अनेक प्रकार आपण ऐकले असतील मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क गोगलगाय आढळून आली आहे.

नेमकं काय प्रकरण?

ऑनलाईन फुड ऑर्डर केलेला व्यक्ती बेंगळूरचा रहिवासी असल्याचे समजते. त्याने काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटमधून'सॅलाड' मागवले होते. तेव्हा फुड घरी आल्यानंतर हा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.

ऑनलाईन फुड ऑर्डर केलेल्या व्यक्तीचे नाव धवल सिंग असे आहे. याच व्यक्तीने त्याच्या सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील@Dhavalsingh7या अकाउंटवर सॅलाडच्या व्हिडीओ शेअर केला असून त्याने ऑनलाईन फुड ऑर्डर केलेल्या हॉटेलवर कारवाई तात्काळ कारवाईही केली आहे.

सोशल मीडियावर याआधीही ऑनलाईन मागवलेल्या जेवणात काही किटक आढळून आलेले आहेत. काही व्यक्तीने नकळत असे जेवण करुन त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले आहे. बेंगळूरमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या अनेक संतापजनक प्रतिक्रिया मिळत आहेत. व्हिडिओला लाखोंच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

Food Viral Video
VIDEO VIRAL: तो Zooमध्ये गेला अन् समोर अचानक सिंह येऊन उभा राहिला; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com