युद्धामुळे देशावर गॅसचं संकट आलं आणि सिलेंडरसाठी रांगा लागल्या...आजही अनेक ठिकाणी गॅससाठी लोक रांगेत उभे आहेत...आणि आता एक मेसेज व्हायरल होतोय, तो पाहिल्यानंतर आणखी संताप आल्याशिवाय राहणार नाही...45 दिवसांनंतर आता सिलेंडर मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...आधी 25 दिवसांनी मिळणारा सिलेंडर 45 दिवसांचा केल्याचा मेसेज व्हायरल झाला...त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय...मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
एलपीजी सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी 45 दिवसांचं अंतर बंधनकारक. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांनाही 45 दिवसांनीच सिलेंडर मिळणार. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...सरकारने खरंच हा नियमांत बदल केलेयत का...? देशात गॅसचं संकट आहे का...? गॅस एजन्सीकडे सिलेंडर उपलब्ध नाहीयेत का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...कारण, शहरात राहणाऱ्यांसाठी गॅस हा महत्त्वाचा आहे...त्यामुळे लोकांमधून संभ्रम दूर करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवली...त्यावेळी सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलंय...
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नियम बदललेले नाहीत
शहरात सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांचाच कालावधी
उज्ज्वला योजना, सामान्य ग्राहकांसाठी जुनेच नियम
शहरी 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी सिलेंडर मिळणार
एलपीजी सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी 45 दिवसांचं अंतर बंधनकारक केल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय...पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं अधिकृत पत्रक काढून बुकिंगच्या नियमांत कुठलाही बदल केला नसल्याचं जाहीर केलं...सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारनं केलंय...त्यामुळे सगळ्यांनाच 45 दिवसांनंतर आता सिलेंडर मिळणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.