Gold Factory: सोनं तयार करण्याची फॅक्टरी? आता शिशापासून तयार करता येणार सोनं?

Fact Check: सोनं खाणीत सापडत होतं हे ऐकलं होतं...पण, आता सोनं फॅक्टरीत बनवता येणार आहे...होय, असा दावा करण्यात आलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...
CERN scientists conduct particle accelerator experiment that reportedly turned lead into gold – viral claim under scanner
CERN scientists conduct particle accelerator experiment that reportedly turned lead into gold – viral claim under scannerSaam Tv
Published On

सोनं आता तयार करता येणार आहे...होय, ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल...पण, आता खाणीतून सोनं शोधण्यापेक्षा शिशापासूनच सोनं बनवता येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? खरंच आता शिशापासून सोनं बनवता येणार आहे का...? हे शक्य आहे का...? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला

शिशापासून आता सोनं बनवता येणार आहे.सोनं आणि शिशाची घनता जवळपास समान असल्याने शिशाचे सोन्यात रूपांतर रासायनिक पद्धतीने शक्य आहे.

हा दावा शास्त्रज्ञांनी केलंय...तसा रिपोर्ट आता समोर आलाय...पण, हे शक्य आहे का...? याबाबत आमच्या व्हायरल सत्य टीमने एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली...

शिसे आणि सोने एकत्रित करून सोने करणं हे अशक्य आहे...शास्त्रज्ञ म्हणत असतील तर ती मोठी क्रांती असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

स्वित्झर्लंडमध्ये संशोधकांनी प्रयोग केलाय

संशोधकांनी शिशाचं रूपांतर सोन्यात केलंय

शिसं आणि सोन्याच्या काही गुणधर्मांमध्ये साधर्म्य असतं

शिशाच्या अणुच्या गाभ्यामध्ये 82 प्रोटॉन्स असतात

सोन्याच्या अणुच्या गाभ्यात 79 प्रोटॉन्स असतात

स्वित्झर्लंडमधल्या LHC च्या भौतिकशास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिक यश साधलंय...हे संशोधन सर्नमध्ये करण्यात आलं...या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी पार्टिकल अ‍ॅक्सिलरेटरचा वापर केला...त्यामुळे आमच्या पडताळणीत शिशापासून सोनं तयार होत असल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com