लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Fact Check Ladki Bahin Yojana New Registration: लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज आणि e-KYC पुन्हा सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल होतोय. मात्र महिला व बालविकास विभागाने नवीन नोंदणी सुरू नसल्याचे स्पष्ट करत अनधिकृत लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केलंय.
Ladki Bahin Yojana New Application & E-kyc Viral Message Fact Check
Ladki Bahin Yojana New Application & E-kyc Viral Message Fact Checksaam tv
Published On: 
Summary
  • लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झाल्याचा दावा

  • e-KYC पुन्हा सुरू झाल्याचा व्हायरल दावा देखील अधिकृत निर्णयावर आधारित नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.

  • अनधिकृत वेबसाइटवर आधार, OTP किंवा अन्य वैयक्तिक माहिती देऊ नये.

आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता लाडकीसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आलीय असा दावा करण्यात आलाय.वेबसाईट सुरू झाल्याचा दावा करण्यात आलाय.पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का? या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

नवीन लाडक्या बहिणींसाठी आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध झालीय.होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय.या मेसेजसोबत एक लिंकही व्हायरल केली जात असल्याने अनेकांनी यावर क्लिक करून अर्ज भरण्याचा प्रयत्न केलाय. पण, खरंच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्यात आलीय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

Ladki Bahin Yojana New Application & E-kyc Viral Message Fact Check
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

लाडकी बहीण योजनेची KYC तुमची राहिलीय का.अनेक महिलांचे पैसे फक्त व्हेरिफिकेशन पेंडिग असल्यामुळे रखडलेत. yojana.list या अकाउंटवरून लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. हा मेसेज व्हायरल होतोय. प्रलंबित हप्ते मिळवण्यासाठी लिंक सुरू करण्यात आल्याचा दावा केल्याने अनेकांनाच याबाबत उत्सुकता आहे.काहींना लाभही बंद झालाय.

त्यामुळे पुन्हा संधी उपलब्ध केली असेल तर बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो.आणि जर हे खोटं असेल तर लाडकींची फसवणूकही होऊ शकते.यामुळेच आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.खरंच सरकारने अशी सेवा पुन्हा सुरू केलीय का? लिंक कोणती आहे? याबाबत माहिती मिळवली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Ladki Bahin Yojana New Application & E-kyc Viral Message Fact Check
Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकीसाठी ई-केवायसी प्रक्रियेची मुदत संपली

नवीन नोंदणी सध्या बंद करण्यात आलीय

कोणत्याही लिंकवरून माहिती भरू नका

लिंक पाठवून तुमच्याकडून पैसे उकळले जाऊ शकतात

लिंकवर क्लिक केल्यास बँक खात्यातील पैसे जाऊ शकतात.

काही लिंक्स किंवा रील्स, व्हायरल व्हिडिओ येत असतात. त्यावर विश्वास ठेवू नये. कारण हे सगळे चुकीचे आहे. महिला बाल विकास विभागाकडून नवीन वेबसाईट नव्याने अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.चुकीच्या वेबसाईटवर गेल्यास फसवणूक होऊ शकते. ओटीपी मागितला जाऊ शकते. नागरिकांनी याला अजिबात बळी पडू नये...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतची अधिकृत माहिती ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत लाडकीसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी उपलब्ध केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com