Snake Operation Viral Video: काय सांगता! सापाचं माणसाप्रमाणे केलं ऑपरेशन; खोटं वाटतंय? मग VIDEO पाहा

King Cobra Viral Video: ऐकावं ते नवलंच! डॉक्टरांनी चक्क सापाचं केलं ऑपरेशन; माणसाप्रमाणे किंग कोब्राची शस्त्रक्रीया
Snake Operation Viral Video
Snake Operation Viral VideoSaam TV
Published On: 

Viral Video: सोशल मीडियावर सतत अतरंगी गोष्टी व्हायरल होताना दिसतात. डॉक्टर आपल्या रुग्णाला झालेला आजार दूर करण्यासाठी योग्य तो उपचार करतात. वेळ पडल्यास यामध्ये मोठमोठ्या शस्त्रक्रिया देखील होतात. आजवर तुम्ही अनेक विचित्र शस्त्रक्रियांविषयी ऐकलं असेल किंवा त्याचे काही व्हिडिओही पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी सापाची शस्त्रक्रिया केलेलं ऐकलंय का? (Latest King cobra Viral Video)

किंग कोब्राचं ऑपरेशन

सोशल मीडियावर (Social Media) किंग कोब्राचं ऑपरेशन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किंग कोब्राच्या पोटात काही तरी वस्तू आहे. ऑपरेशन करुन ती वस्तू त्यांना बाहेर काढायचीये. किंग कोब्राला पडकून त्याचं ऑपरेशन करणं खरं तर काळजात धडकी भरवणारंच आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला भूल दिली असून त्याचं ऑपरेशन करण्यात येत आहे.

Snake Operation Viral Video
Rain Dance Viral Video: पहिला पाऊस; दोघांच प्रेम अन् भर रस्त्यात रोमँटिक डान्स... व्हिडिओ पाहून नेटकरी प्रेमात!

सापाच्या पोटाला टाके

डॉक्टरांनी या किंग कोब्राचं (King Cobra) ऑपरेशन करुन ती वस्तू बाहेर काढली आहे. तसेच त्याच्या पोटाला टाके देखील मारले आहेत. ऑपरेशन रुममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे. ऑपरेशनचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाच्या ट्वीटर (Twitter) अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज आलेत. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी यात म्हटलं आहे की, ११-६-२०२३ रोजी मंगळूर, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील GIT मध्ये एका कोब्रावर डॉ.यशस्वी नरवी यांनी शस्त्रक्रिया केली. किंग कोब्राची यशस्वी शस्त्रक्रीया केल्याने या डॉक्टरांच विशेष कौतुक होत आहे.

Snake Operation Viral Video
Beach Dance Viral Video: समुद्रात भडकली चिंगारी; जोडप्याचा रोमँटिक डान्सने सोशल मीडियावर वातावरण तापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.