Shocking News
Shocking NewsSaam Tv

Shocking News: नशीब म्हणावं ते हेच! महिला रस्त्यावरून जात होती, अचानक भींत कोसळली, अंगावर काटा आणणारा VIDEO

मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची भिंत कोसळली. त्याचवेळी तेथून एक महिला जात होती. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Published on

'देव त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय नुकताच झारखंड मधील एका महिलेला आला. झारखंडच्या राची शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यालगची भिंत कोसळली आहे. दरम्यान भिंत कोसळत असताना एक महिला तेथून प्रवास करीत होती. सुदैवाने ही महिला बचावली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा सीसीटीव्ही देखील व्हायरल होत आहे.

Shocking News
Viral Video: विमानात फ्री स्टाईल हाणामारी, त्याने गळा पकडला, तिने पोटात बुक्क्या मारल्या, पाहा व्हायरल व्हिडिओ

झारखंड येथे पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याचदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पावसामुळे अचानक भिंत कोसळताना दिसत आहे. याचदरम्यान तेथून एक महिला जात असताना ही भिंत कोसळत आहे. यामुळे महिलेच्या अंगावर ही भिंत कोसळते की काय असा प्रश्न पडला आहे. मात्र तुम्ही पाहू शकता भिंत कोसळल्यानंतर महिला तेथून बाजूला जाताना दिसत आहे. महिला या घटनेत थोडक्यात बचावली आहे. महिला एका हातात छत्री घेऊन तेथून वाट काढत जाताना दिसत आहे.

पावसामुळे भिंती कोसळण्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील. यामुळेच पावसात काळजी घेणं महत्वाचं आहे. वरील घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. क्षणात या महिलेसोबत होत्याचं नव्हतं झालं असतं. रस्त्यावरून जात असाना अचानक भिंत कोसळली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shocking News
मुलीनों, Google Gemini वापरून बनवा आतापर्यंतचा सुंदर लूक, हे आहेत 5 Prompts
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com