Fact check : माणसाळलेल्या डॉल्फिननं मालकिणीलाच खाल्लं, जेसिका आणि ऑर्काच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Jessica orca dolphin video : सोशल मीडियावर सध्या जेसिका आणि ऑर्का या डॉल्फिनचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. त्यात डॉल्फिननं मालकीण जेसिकाला स्विमिंग पूलमधील शो दरम्यान खाल्ल्याचा दावा केला जात आहे. पण या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? हे जाणून घेऊयात.
जेसिकाला डॉल्फिननं खाल्लं, काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
Jessica orca dolphin video fact checksaam tv
Published On
Summary
  • जेसिका आणि ऑर्काचा डॉल्फिन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • दावा काय? शो दरम्यान डॉल्फिननं मालकिणीला खाल्लं

  • जेसिका-ऑर्काच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

  • फॅक्ट चेकमध्ये समोर आलं हादरवणारं सत्य

जेसिका आणि तिचा डॉल्फिन ऑर्का यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. सोशल मीडियावर या दोघांचा एका शो दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. ऑर्का हा डॉल्फिन आपल्या मालकिणीला म्हणजे जेसिकालाच खाऊन टाकतोय असा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेसिकाचा जीव घेतला त्या डॉल्फिनला तिनं लहानपणापासूनच पाळलं होतं.

जेसिका-ऑर्काच्या बालपणीचा किस्सा काय?

जेसिका आणि ऑर्काच्या बाबतीत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. काही व्हिडिओमध्ये तर जेसिका आणि ऑर्काच्या लहानपणीची गोष्टच सांगितलीय. जेसिकाला ऑर्का हा डॉल्फिन समुद्रावर सापडला होता. जेसिकानं त्याला घरी नेलं आणि त्याचं पालनपोषण केलं. ऑर्काच्या सोबत ती खेळत सुद्धा होती.

दोघांचे वेगवेगळ्या देशांमध्ये शो देखील व्हायचे. या शोमध्ये स्विमिंग पूलमध्ये जेसिका आणि ऑर्का साहसी खेळाचं प्रदर्शन करायचे. पण याच माणसाळलेल्या डॉल्फिननं एका शो दरम्यान मालकीण जेसिकाला खाल्लं, असा दावा केला जातोय. सोशल मीडियावर या दोघांचे हजारो व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहेत. त्यात माणसाळलेला डॉल्फिन अचानक पिसाळतो आणि त्याच्या मालकिणीवरच हल्ला करतो आणि तिला खातो. एका व्हिडिओत तर जेसिका त्याला हात जोडून विनवणी करते, पण तो तिला उचलून पाण्यात आपटतो, असा दावाही करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा?

जेसिका आणि डॉल्फिन हे दोघे एका शोमध्ये अद्भूत आणि अविश्वसनीय अशा करामती करून दाखवत आहेत. शो रंगात आला असताना अचानक डॉल्फिन आक्रमक होतो आणि जेसिकावर हल्ला चढवतो. काही कळायच्या आत तिला पाण्यात ओढून खातो. अखेरच्या क्षणाला काही लोक वाचवायला धाव घेतात. पण त्याआधीच फक्त डॉल्फिनच त्यांच्या नजरेस पडतो. जेसिका नाही. पण या व्हिडिओत केलेला दावा सफेद झूठ आहे. ही सगळी गोष्ट काल्पनिक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्व व्हिडिओ हे कृत्रिम बुद्धिमतेच्या मदतीने अर्थात एआयने तयार केलेले आहेत.

जेसिकाला डॉल्फिननं खाल्लं, काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
Interesting History Facts: I Love मुंबई ते I love सोलापूर... 'या' ट्रेंडची सुरुवात कधी झाली?

सत्य काय ?

या व्हिडिओंमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये आणि रचलेली गोष्ट सर्व काही खोटं आहे. ही घटना किंवा जेसिका नावाच्या तरुणीचा कुठेही साधा उल्लेख सापडत नाही. व्हिडिओ, त्या व्हिडिओमधील प्रेक्षक, स्विमिंग पूल असलेले ठिकाण, ऑर्का नावाचा डॉल्फिन, इतकंच काय तर शो आणि त्याच्या आजूबाजूचा आवाज हे सुद्धा एआयच्या मदतीने केलेले आहे. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करून व्ह्यूज मिळवले जातात. त्यावर सर्वसामान्य नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये किंवा ते फॉरवर्ड करू नयेत, असं जाणकारांकडून सांगितलं जातंय.

जेसिकाला डॉल्फिननं खाल्लं, काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
Fact check : 'मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो...'; काय आहे FB पोस्टमागचं सत्य? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com