मुंबईत मेंढ्यांच्या निर्दयी झुंजीचा खेळ, 'रॉकी'चा बळी , VIDEO

mumbai sheep fight news : कायद्याने जनावऱांच्या झुंजीवर बंदी आहे..असं आसताना चक्क मुंबईत मेंढ्यांच्या निर्दयी झुंजीचा खेळ झाला... अन् होत्याचं नव्हतं झालं... नेमकं घडलंय काय पाहुयात....
 sheep fight
mumbai sheep fight news Saam tv
Published On

मुंबईच्या जोगेश्वरीत आक्रित घडलंय.. ज्याला हुती कायद्यानं बंदी.... तीच झुंज पाहण्यासाठी जमलेत छंदी...

टक्करीसाठी वाकड्या शिंगाचं अन् बाकदार नाकाचं मेंढं आलं होतं. टक्करीचं ठिकाणं ठरलं जोगेश्वरीचं रावजी मैदान... लाल मातीच्या मैदानात सुरु झाला टकरीचा खेळ

दोन्ही मेंढ्यांना एकमेकांची तोंड दाखवली... लाल शिंगाच्या मेंढ्यांचं नाव चमकीला... अन् निळ्याचं नाव होतं रॉकी दोघं बी तसं दिसायला ढ्याशिंग अन् रुबाबदार... टक्करी देणारं एक- दोन - तीन म्हणालं अन् सुरु झाला खेळ.... एका मागणं एक दणादण चार टक्करी झाल्या... दोन्ही मेंढ दमलं.... पाचव्या टक्करीला सुरुवात झाली अन् रॉकी कोसळला... कोसळलेल्या रॉकी मेंढ्याला उठवण्याचा प्रयत्न झाला पण रॉकी काय उठलाच नाय...या टक्करीत रॉकी मेला...

 sheep fight
Viral video mumbai: एकाच मुलीच्या प्रेमात दोघेही वेडे झाले, रेल्वे स्टेशनवर गुलीगत मारामारी, लोकल ट्र्रॅकवरच एकमेकांना तुडवले

कायद्यानं बंदी असणाऱा खेळ खेळल्यानं गुन्हा दाखल झालाय... या भानगडीत पोलिसांनी तिघांना उचललं अन् बेड्या ठोकल्या.... कायद्यानं या गुन्हेगारांवर कारवाई होईलच त्यांना शिक्षा होईलच... पण पोलिसांनी अधिक पावलं उचलली असती तर रॉकीचा जीव वाचला असता... या सगळ्या करामती करणाऱ्या पोरांच्या खेळावर एकच म्हण आठवती... खेळ झाला माकडांचा अन् जीव गेला बेडकाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com