Idli Samber Ice Ceam: हेच पाहायचं राहिलं होतं! ईडली सांबर आईस्क्रिमनं गाजवलं मार्केट, VIDEO व्हायरल

Idli Samber Ice Ceam Video Viral: सध्या मार्केटमध्ये ईडली सांबर आईस्क्रिमची एन्ट्री झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Idli Samber Ice Ceam Food
Idli Samber Ice Ceam Food Saam Tv

सोशल मीडियावर स्ट्रीट फुडचे व्हिडिओ (Idli Samber Ice Cream Food Video) नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या मार्केटमध्ये ईडली सांबर आईस्क्रिमची एन्ट्री झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या डिशमध्ये ईडली,सांबर आणि आईस्क्रिमचं कॉम्बिनेशन दिसत आहे. ही आईस्क्रिम बघून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, सर्वात आधी त्या व्यक्तीने एक ईडली घेतली. त्या ईडलीवर त्याने चटणी आणि सांबर टाकलं. त्यानंतर त्याने हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. त्यानंतर या मिश्रणामध्ये मिल्कमेड, (Idli Samber Ice Cream) फ्रेश क्रिम आणि थोडं दूध टाकलं. हे सर्व मिश्रण त्याने एका बर्फाच्या लादीवर पसरवले. ते गोठल्यानंतर त्याने त्याचे रोल तयार केले. हे रोल ग्राहकांना खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह (viral) केलंय.

हा व्हिडिओ foodb_unk या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. तो व्हिडीओ ५ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. बरेचजण ही अजब गजब आईस्क्रिम बघून डोक्याला हात लावत आहे. (street food video) खरं तर आज काल कोणत्याही पदार्थांचं कॉम्बिनेशन करून एक नवीन डिश तयार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा डिशचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच फिरत असतात.

कधी भेंडी समोसा, मॅगीची भजी, बिस्किटांची भजी आपण याअगोदर बघितली आहेत. आता मात्र या लोकांनी आईस्क्रिम अन् ईडली या दोघांनाही सोडलं नाही. ईडली आणि सांबरमध्ये दूध टाकून चक्क आईस्क्रिम तयार केलं आहे. (viral video) आता या आईस्क्रिमची चव कशी असेल, ते देवच जाणे. गेल्या काही काळात स्ट्रीड फूड्सचं प्रमाण वाढलं आहे.

Idli Samber Ice Ceam Food
Madness Machayenge Show : हेमांगी कवी, कुशल बद्रिकेनंतर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये एन्ट्री, टीझर VIRAL

काहींनी या डिशला या पदार्थाला ‘मोए…मोए…ईडली आईस्क्रीम’ असं म्हटलं आहे. तर काहीजण म्हटले आहेत की, ही डिश बघू दक्षिण भारतातील लोकं कोपऱ्यात उभं राहून रडत असतील.(viral news) ईडली सांबरमध्ये दूध टाकून तयार केलेला हा अजब पदार्थ पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.

Idli Samber Ice Ceam Food
Girl Viral Video: तिने कहरच केला..., सलूनमध्ये बसून पोरीने केली चक्क दाढी; Video तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com