Kullu Manali flood: रस्ते- महामार्ग गेले वाहून, दुकाने आणि इमारतही कोसळली; कुल्लू मनालीत पावसाचा हाहाकार VIDEO

हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बियास नदीला पूर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला आहे.
Kullu Manali flood
Kullu Manali floodSaam Tv
Published On

हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे मुसळधार पावसाची बॅटींग सुरू आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. दरम्यान बियास नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुल्लू मनाली राष्ट्रीय महामार्ग ३ चा ३ किलोमीटर भाग पाण्याखाली गेलाय. नदीला पूर आल्याने नदीचं पाणी रस्यावर आलय. सध्या कुल्लू मनाली येथील परिस्थिती खूपच गंभीर आहे.

Kullu Manali flood
Viral Video: तुम्हीही ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून म्हणाल अशीच अवस्था आहे आमची

सतत पावसामुळे भूस्खलन झाले आहे. सकाळी या मार्गावरील २ र रेस्टॉरंट्स आणि २ दुकाने कोसळली. व्यास नदीलाही पूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने दोन मजली इमारत कोसळली आहे. दुवाडा जवळील बियास नदीवर बांधलेला पादचारी पूल पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पलीकडे बांधलेल्या लार्जी पॉवर हाऊसच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी हा पूलचा मार्ग आहे.मात्र पाण्याची पातळी वाढल्याने पाणी पुलापर्यंत पोहचले असून पादचारी पूल कोसळला.

Kullu Manali flood
Viral Video: ऑफिसला सुट्टी नाही, मग मुलीने केलं नको ते कृत्य, थेट मॅनेजरलाही केला व्हिडीओ कॉल

बियास नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून ते पाणी आता महामार्गापर्यत पोहोचले आहे. दरम्यान बीबीएमबीने पांडोह धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. धरणातून सुमारे ९० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. सुरक्षिततेसाठी २७ ऑगस्ट सकाळपर्यंत पांडोह धरणाचे फ्लशिंग सुरू राहण्याचे आदेश दिले आहे. या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सतत पाऊस, भूस्खलन आणि वाढत्या नदीच्या पाण्यामुळे कुल्लू मनाली परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष असल्याची माहिती आहे.

Kullu Manali flood
Viral Video: पेट्रोल पंपावर दुचाकीवरून उतरला अन् जागेवरच धाडकन पडला, तरूणाचा जागेवरच मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com