लोकं सुंदर दिसण्यासाठी काय करतील, हे सांगता येत नाही. कोण रंगीबेरंगी केस करत, तर अनेकजण विचित्र हेअरस्टाईल करतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारे केसं कापतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण आपली हेअरस्टाईल करण्यासाठी केसांना आग लावून घेत आहे. (latest marathi news)
लोक अनेकदा सलूनमध्ये केसांना सेट घेण्यासाठी जातात. त्यांच्या आवडीनुसार केस कापून घेतात. सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे केस सहसा न्हावी कात्रीने कापतात आणि सेट करतात, पण तुम्ही कधी आगीने केस कापताना पाहिलं (Hairstyles With Fire) आहे का? असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ग्राहकाचे केस कापण्यासाठी कात्रीऐवजी आगीचा वापर करताना दिसत आहे. त्याची केस कापण्याची पद्धत अत्यंत भयंकर आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
आगीच्या साहाय्याने केला हेअरकट
हा व्हिडिओ X वर @PicturesFoIder नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला 16.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावर केसांची टोके जळण्याचा नेमका अर्थ काय? केस कापण्याच्या नावावर हे काय आहे, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सलूनमध्ये केस कापताना दिसत आहे. यादरम्यान, न्हावी कात्रीऐवजी आगीने केस कापण्यास सुरुवात करतो. तो आपल्या ग्राहकाचे केस जाळण्यासाठी टॉर्च (hairstyle Video) वापरतो. जळलेले केस अचूकपणे काढून टाकतो. ग्राहकाच्या डोक्याभोवती आग दिसतंय, हे चिंताजनक दिसत आहे, परंतु तो ग्राहकांच्या केसांना त्याच पद्धतीने स्टाइल करत आहे.
हेअरकट सोशल मीडियावर व्हायरल
या व्हिडिओमध्ये न्हाव्याची केस (Hairstyles) कापण्याची पद्धत पाहून अनेक लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. त्याने ग्राहकाचे केस कात्रीने नव्हे तर आगीने कापले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की, ग्राहक तरूण अगदी बिनधास्तपणे आपले केसं कापून घेत आहे. फॅशन आणि स्टाइलच्या नावाखाली धोका पत्करण्याची सवय लोकांना लागली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, न्हाव्याने कात्रीऐवजी त्याने आगीचा वापर केला आहे. त्याने कुशलतेनं ग्राहकाच्या केसांवर कंगवा फिरवला. त्यानंतर ग्राहकाचा हेअरकट केला. हे दृश्य अतिशय भितीदायक (hairstyle Video Viral) आहे. परंतु न्हाव्याने आगीच्या मदतीने ग्राहकाची अनोखी हेअरस्टाईल करून आपलं कौशल्य दाखवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.