Viral News : वाढीव बिलामुळे नगरसेविका संतापली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात धडकली, अधिकाऱ्यांवर भडकली, VIDEO

वाढीव वीज बिलामुळे गुजरातमधील काँग्रेस नगरसेविका रचना यांनी थेट वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाढीव बिलामुळे नगरसेविका भडकली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांवर खेकसली
Viral VideoSaam tv
Published On

Gujarat Jamnagar : गुजरातच्या जामनगरमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला थेट वीज वितरण विभागाच्या कार्यालयात काठी घेऊन पोहोचली. काठी हातात असलेली महिला वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवरच खेकसली. महिलेने कार्यालयातील अधिकाऱ्यांना थेट मारहाणीची धमकी दिली. या व्हिडिओमध्ये ही महिला नगरसेविका आहे. महिला नगरसेविकाच्या संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुजरातमध्ये नवीन स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिल वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वाढीव वीजदरामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. या त्रस्त नागरिकांनी नगरसेविका रचना नंदाणीया यांना तक्रार केली. त्यानंतर नगरसेविका संतापून थेट वीज वितरण कार्यालयात पोहोचली. या व्हिडिओमध्ये नगरसेविका थेट अधिकाऱ्याच्या समोर काठी घेऊन उभी ठाकली.

वाढीव बिलामुळे नगरसेविका भडकली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांवर खेकसली
Fact Check : डासांना मारणाऱ्या कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

काँग्रेस नगरसेवक रचना नंदाणीया यांनी काठी घेऊन जामनगरमधील वीज वितरण कार्यालयात राडा केला. रचना नंदाणीया यांनी हातात काठी घेऊन वीज वितरण कार्यायलयात एन्ट्री केली. त्यानंतर कार्यालयातील कर्मचारी अवाक झाले. रचना यांचा अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नगरसेविका फक्त अधिकारीच नव्हे तर कर्मचाऱ्यांवरही काठी घेऊन भडकली. या नगरसेविका रचना यांचा संतापाचा व्हिडिओ देशभरात व्हायरल होत आहे. नगरसेविका रचना यांची देशभर चर्चा होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर काही नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. तर काही जण त्यांची जाब विचारण्याची पद्धत चुकीचं असल्याचं म्हणत आहेत.

वाढीव बिलामुळे नगरसेविका भडकली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांवर खेकसली
Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

नगरसेविका रचना यांनी खूप वेळ कार्यालयात हंगामा केला. कार्यालयात सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. यानंतर वीज वितरण कार्यालयातील अधिकऱ्यांनी पोलिसांना बोलावून नगरसेविकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com