Viral Video: अबब! नवरदेवाला लग्नात मिळाली मर्सिडीज, १ कोटी रुपये अन् १. २५ किलो सोनं; VIDEO पाहून चक्रावून जाल!

Noida Viral Wedding Video: ४ फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नात नवरदेवाला एक मर्सिडीज, फॉर्च्युनर कार तसेच रोख रक्कम आणि दागिनेही मिळालेत.
Noida Viral Wedding Video
Noida Viral Wedding VideoSaamtv
Published On

Viral Wedding Video News:

भारतीय संस्कृतीत हुंडा घेण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही हुंडा घेण्याची प्रथा बंद घेण्यासाठी अनेक कडक कायदे अस्तिवात आहेत. मात्र तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. अशिक्षितांसह सुशिक्षित लोकही या प्रथेचे प्रचार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

अलिकडच्या काळात लग्नसोहळा धुमधडाक्यात करण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लग्न सोहळ्यात अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याच्या बातम्याही समोर येत असतात. मात्र नोएडामध्ये एका लग्न सोहळ्यात नवरदेवाला दिलेल्या वस्तूंची यादी ऐकून नेटकरीही हैराण झालेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नात नवरदेवाला एक मर्सिडीज, फॉर्च्युनर कार तसेच रोख रक्कम आणि दागिनेही मिळालेत. तर मुलीकडच्यांना भेट म्हणून एक कोटी रुपये देण्यात आले. या लग्नातील व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Noida Viral Wedding Video
BJP Vs Thackeray Group Clash : गुहाघरमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर मोठा राडा; निलेश राणेंच्या कारवर दगडफेक

या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लग्नसमारंभात मिळालेल्या वस्तूंची यादी एक व्यक्ती वाचत आहे. यामध्ये एक मर्सिडीज ई-क्लास कार, एक टोयोटा फॉर्च्युनर, 7 किलो चांदी आणि 1.25 किलोपेक्षा जास्त सोन्याचा समावेश आहे. इतकेच नव्हेतर एक कोटी रुपये रोख रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, साम टीव्ही कोणत्याही प्रकारे या व्हिडिओचे समर्थन किंवा पुष्ठी करत नाही. मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काहींनी या बडेजावाचे समर्थनही केले आहे. (Latest Marathi News)

Noida Viral Wedding Video
Ramdas Kadam : 'मातोश्रीवर खोक्यांचा पाऊस पाडावा लागतो, तरच...'; रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com