Grapes Side Effects : द्राक्ष खाल्ल्याने तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर; कारण काय? पाहा व्हिडीओ

Viral Video : द्राक्ष विक्रेते द्राक्ष खराब होऊनयेत त्यामुळे त्यांना पेस्टिसाइड करतात. त्यामुळेच नागरिकांना या समस्या वाढत आहेत, असा दावा तरुणाने केला आहे. तसेच द्राक्ष खाल्ल्याने आपल्या शरीरावर
Grapes Side Effects
Grapes Side EffectsSaam TV
Published On

Viral Video :

उन्हाळा सुरू असल्याने सध्या बाजारात विविध प्रकारची फळे विक्रिसाठी आली आहेत. यामध्ये कलिंगड आणि द्राक्ष मोठ्या प्रमाणावर विकले जातात. तुम्ही देखील उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी व्हावी म्हणून द्राक्ष खात असाल. मात्र द्राक्ष खाल्ल्याने कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे, असा दावा एका तरुणाने केलाय.

Grapes Side Effects
Drinking Hot Water In Summer : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? जाणून घ्या

सोशल मीडियावर @maths_by_vedantsir या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओमध्ये तरुण सांगत आहे की, गेल्या १० दिवसांत भारतात अनेक व्यक्तींना घशाचे आदार जाणवू लागले आहेत. घशात त्रास, जळजळ आणि ताप येण्याच्या केस वाढत आहेत. वातावरण बदलामुळे असे होत असावे सुरुवातीला वाटले. मात्र याचे कारण काही वेगळे आहे, असं यामध्ये तो सांगत आहे.

काही रुग्णांशी मी बातचीत केली तेव्हा समजले की, या सर्वांना हा त्रास सुरु होण्याआधी त्यांनी द्राक्ष खाल्ले होते. द्राक्ष विक्रेते द्राक्ष खराब होऊनयेत त्यामुळे त्यांना पेस्टिसाइड करतात. त्यामुळेच नागरिकांना या समस्या वाढत आहेत, असा दावा तरुणाने केला आहे. तसेच द्राक्ष खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊनये म्हणून काय करावे हे देखील तरुणाने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

द्राक्ष घरी आणल्यावर खाण्याआधी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका. या मिठाच्या पाण्यात द्राक्ष आर्धा तास तरी भिजत ठेवा. त्यानंतर वॉश करुन ही फळे खाऊन घ्या. असं त्या तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे माहिती नाही.

मात्र सध्या भेसळयुक्त पदार्थ, फळे, भाजीपाला बाजारात जास्त प्रमाणावर विकला जात आहे. फळे लवकर पिकावीत म्हणून त्यावर विविध औषधांचा मारा केला जातो. त्यामुळे फक्त द्राक्षच नाही तर अन्य कोणतेही फळ किंवा भाजी घरी आणल्यावर स्वच्छ पाण्यात चांगली धुतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.

Grapes Side Effects
Breaking News: देशातील सर्वात मोठ्या पुलाचा गर्डर कोसळला; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले, थरारक VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com