Gautami Patil: तुम्हा बघून तोल माझा गेला… नाचता नाचता गौतमी स्टेजवरच कोसळली, पाहा VIDEO

Gautami Patil Fall From Stage: प्रत्येक गावागावात तिच्या डान्सने तरुणाईला भूरळ घातली आहे.
Gautami Patil
Gautami PatilSaam TV

Gautami Patil In Sangali:

तरुणांची विकेट पाडणाऱ्या गौतमी पाटील बाबत एक बातमी समोर आली आहे. गौतमी एका कार्यक्रमात डान्स करत असताना स्टेजवरून खाली कोसळली आहे. तिच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

गौतमी भरकार्यक्रमात स्टेजवरून खाली पडल्याने चाहत्यांकडून तिची काळजी व्यक्त केली जात आहे. सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमीने आजवर आपल्या कलेच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. प्रत्येक गावागावात तिच्या डान्सने तरुणाईला भूरळ घातली आहे.

Gautami Patil
Gautami Patil In Mumbai: गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाचा राडा; स्टेजखाली प्रेक्षकांनीच कुटलं

दहीहंडी निमित्त गौतमी मुंबईत देखील आली होती. यावेळी मुंबईकरांची तिने मने जिंकली. अशात सांगलीच्या पसूल येथे रविवारी रात्री दहीहंडीच्या कार्यक्रमात गौतमीचा डान्स आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमीची एन्ट्री होताच शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करण्यात आलं.

काही वेळातच गौतमीचा डान्स सुरू झाला. यावेळी गौतमी फॅन्टास्टीक या लावणीवर कला सादर करत होती. डान्स सुरू असताना गौतमीने दणक्यात सगळ्यांची मने जिंकली. नाचता नाचता तिचा पाय स्टेजखाली घसरला आणि गौतमी खाली कोसळली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Gautami Patil
Gautami Patil Father: गौतमी पाटीलचे वडील आढळले दयनीय अवस्थेत; रस्त्याच्या कडेला पडले होते बेशुद्धावस्थेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com