Gautami Patil In Mumbai: गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाचा राडा; स्टेजखाली प्रेक्षकांनीच कुटलं

Gautami Patil's Mumbai Program: गौतमीची एन्ट्री होताच गोविंदांचा उत्साह काल द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळालं.
Gautami Mumbai Program
Gautami Mumbai ProgramSaam TV

Dahi Handi Festival 2023:

गौतमी पाटील म्हणजे जबरदस्त डान्स, धिंगाणा आणि नुसता राडा हे समिकरण आता नेहमीच पाहायला मिळतंय. खेड्यापाड्यांत गौतमीने आपल्या जादूने तरुणांना भूरळ घातलीये. तिच्या डान्समुळे आतापर्यंत सर्वच गावांमध्ये गोंधळ झालाय. आता चमचमणाऱ्या मुंबई शहरात देखील गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला आहे. (Latest Marathi News)

काल दहीहंडीनिमित्त गौतमी मुंबईत आली होती. मुंबईकरांचे आणि गोविंदाचे मनोरंजन करण्यासाठी आलेल्या गौतमीने मुंबईत आपली कला सादर केली. यावेळी गोविंदांच्या मनोरंजनासाठी अनेक बॉलिवूड स्टार्ससह मराठी सिनेविश्वातील कलाकार उपस्थित होते. मात्र गौतमीची एन्ट्री होताच गोविंदांचा उत्साह काल द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळालं.

Gautami Mumbai Program
Nanded Politics: नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

गौतमी पाटील काल ठाण्यातील मागाठाण्यात आली होती. येथे तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कलाकार येथे आलेहोते. गौतमीला देखील या कार्यक्रमात आमंत्रण होतं. गौतमी आली आणि तिने आपला डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी एक तरुण स्टेजवर चढू लागला. त्याला पाहून उपस्थित व्यक्तींनी त्याला थांबवलं. मात्र तो थांबला नाही. त्यामुळे काही व्यक्तींनी त्याला स्टेजखालीच मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. तसेच उपस्थित गोंधळ शांत केला. मुंबईत एवढेसारे कलाकार असून देखील गौतमीच्याच कार्यक्रमात तरुणाई बावरली आणि राडा झाला. यामुळे तिची क्रेज मुंबईतही फार आहे असं म्हटलं जातंय.

Gautami Mumbai Program
Dahihandi Special | सेना पक्षफूटीचा दहीहंडी मंडळांवर परिणाम ?;मंडळांवर कोणता झेंडा घेऊ हाती स्थिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com