Meloni VIDEO: मेलोनी यांच्यावर चढला भारतीय संस्कृतीचा रंग; नमस्कार करत केलं G7 च्या पाहुण्यांचं स्वागत

Giorgia Meloni Welcomed Guest With Namaste: इटली दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करताना म्हटलं की, इटलीच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून मी G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इटलीला जात आहे. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधानांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Meloni VIDEO: मेलोनी यांच्यावर चढला भारतीय संस्कृतीचा रंग; नमस्कार करत केलं G7 च्या पाहुण्यांचं स्वागत
Giorgia Meloni Welcomed Guest With NamasteX
Published On

G7 शिखर परिषद इटलीमध्ये आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर जाताहेत. पंतप्रधान मोदी देखील या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीसाठी जगभरातील दिग्गज नेत्यांचा मेळावा होणार आहे. दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. G7 शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते इटलीत आलेत. या नेत्यांचे स्वागत मेलोनी यांनी केले.

जी7 च्या शिखर परिषदेत जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ आले . त्यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. ओलाफ यांचं स्वागत करताना मेलोनी यांनी भारतीय पद्धतीने त्यांचे स्वागत केलं. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नेटकरी मेलोनी यांचे कौतुक करत आहेत. इटलीच्या पंतप्रधानांच्या कृत्यातून भारतीय संस्कृती दिसत आहे.

या परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, जर्मन चांसलर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे इटलीला पोहोचलेत.

G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान मोदी अनेक मुद्द्यांवर बोलणार आहेत. भारतासह ग्लोबल साउथच्या मुद्द्यांवर ते चर्चा करतील, असे मानले जातंय. भारत G7 परिषदेत अतिथी देश म्हणून उपस्थित असणार आहे. भारत ११ व्यांदा अतिथी देश म्हणून G7 शिखर परिषदेत सहभागी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com