Funny Viral Video
Funny Viral VideoSaam Tv

Funny Viral Video : जुगाडू बाप, चिमुकल्याला दुधाच्या किटलीत बसवलं! रितेश देशमुखने शेअर केला VIDEO

Viral VIdeo : व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलाला बाईकवर घेऊन जाताना दिसत आहेत.
Published on

Socia Media VIdeo :

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सहज काढलेले व्हिडीओ अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात. अनेक व्हिडीओ लोकांना आवडतात, तर काही व्हिडीओ प्रचंड संताप आणणारे असतात. असाच काहीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून हसावं की राग व्यक्त करावा अशा द्विधा मन:स्थितीत व्हिडीओ पाहणारे आहेत.

सोशल मीडियावर एका जुगाडू बापाचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलाला बाईकवर घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र तो मुलगा बाईकवर नाही तर बाईकच्या बाजूला बसला आहे. (Viral VIdeo)

व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, वडील दुधाच्या किटलीत मुलाला घेऊन चालले आहेत. साधारण 2 वर्षे मुलाचे वय असल्याचे दिसते आहे. मुलाला मागे किंवा समोर बसवण्याऐवजी दुधाच्या किटलीत तो जास्त सुरक्षित राहिल, असं त्याच्या वडिलांना वाटलं असावं. मात्र किटलीत ठेवणे अधिक धोकादायक दिसत आहे. कारण चिमुकल्याच्या डोक्याला, तोंडाला इजा होण्याचा धोका आहे. (Latest News Update)

Funny Viral Video
Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं
Funny Viral Video
Car Stunt: स्टंटमॅनने इमारतीवरुन भरधाव कार उडवली; पण अंदाज चुकला अन् भलतच घडलं, पाहा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील हा व्हिडीओ X अकाऊंटवर शेअर केला आहे. रितेशने जुगाडू बाप असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. अनेकांना हा व्हिडीओ मजेशीर वाटला आहे. तर काहींना याबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com