Car Stunt: स्टंटमॅनने इमारतीवरुन भरधाव कार उडवली; पण अंदाज चुकला अन् भलतच घडलं, पाहा VIDEO

Viral Car Stunt Video: आपण चित्रपटात हवेत उडणाऱ्या कारचे व्हिडिओ पाहिले असतील. त्या व्हिडिओमध्ये कारचं आणि कार चालकाचं काही होत नाही. असे स्टंट पाहून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात.
Viral Car Stunt
Viral Car StuntSaam Tv

Evgeny Chebotarev Viral Car Stunt:

रस्त्यावरील अपघात पाहून थरकाप होत असतो. अपघात होऊ नये, यासाठी आपण सावधपणे वाहनं चालवत असतो. परंतु असे काही लोक आहेत, जे स्वत:हून यमाला आमंत्रण देत असतात. असाच प्रकार रशियाच्या (Russia)एका स्टंटमॅननं केलाय. या स्टंटमॅनचं नाव इवगेनी चेबोत्रेव आहे. सोशल मीडियावर अधिक लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी जिवाचा थरकाप उडवणारा स्टंट या स्टंटमॅनने केला. दुर्दैवानं त्यांचा हा स्टंट चुकला आणि कारचा चुराडा झाला.

इवगेनी चेबोत्रेव (Evgeny Chebotarev)हे स्टंटमॅन आहेत. ते अनेक धोकादायक स्टंट करत असतात. यावेळी ते एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर कार नेण्याचा स्टंट करत होते. परंतु दुर्दैवानं त्याचा हा स्टंट चुकला आणि कारचा चुराडा झाला. त्यांच्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला इवगेनी हे एक कार भरधाव वेगानं एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर नेत असल्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु ही कार दुसऱ्या इमारतीच्या छतापर्यंत पोहोचू शकली नाही आणि कार चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. यात कारच्या चुराडा झाला. (Latest News)

कारची स्थिती पाहून आपला थरकाप उडाला असेल. जर कारची स्थिती अशी होत झाली तर चालकांचं काय झालं असेल याचा विचार न केलेला बरा. नाही का? कारची स्थिती पाहून चालकाचा देखील मृत्यू झाला असेल. त्यांची स्थिती पाहण्यासारखी नसेल, असं अनेकांना वाटलं असेल. परंतु स्टंटमॅन इवगेनी चेबोत्रेव सुरक्षित बाहेर आले. स्टंट करताना अपघात होताच तेथे उपस्थित असलेले इतर स्टंटमॅन तेथे आले आणि त्यांनी इवगेनीला सुरक्षित बाहेर काढलं.

दरम्यान स्टंटमॅन इवगेनी चेबोत्रेव यांनी या स्टंटचे दोन व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ही व्हायरल बातमी करेपर्यंत या व्हिडिओला एक-एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. अनेकांना हे व्हिडिओ पाहून आश्चर्यचा धक्का बसलाय तर काहीजण स्टंटमॅनवर टीका करत आहेत. अशा कामात एवढा धोका असताना लोक जाणूनबुजून जीव धोक्यात का घालतात, असा प्रश्ना अनेकांना पडला असेल.

पण या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाला प्रत्येकांच लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे आहे. यामुळे अशा काही गोष्टी करून ते असे व्हिडिओ पोस्ट करत असतात. हे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांना अधिक लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळत असतात, त्यातून त्यांना पैसा मिळत असतो. परंतु जिवाला धोका निर्माण होईल, असे स्टंट कोणी करू नये.

Viral Car Stunt
Women Viral Video: आफ्रिकन महिलांची दादागिरी; नेदरलँडमध्ये भारतीय तरुणीला चापट, लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com