Fact Check:लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना?सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार?काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?VIDEO

Free Washing Machine: लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे...होय, केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे...मात्र, हे आम्ही म्हणत नाहीये...तसा दावा करण्यात आलाय...खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
ladki bahin yojana
ladki bahin yojana saam tv
Published On

लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणाराय....कारण, लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...या मेसेज सोबत एक लिंकही देण्यात आलीय...त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय...खरंच सरकार वॉशिंग मशीन मोफत देतंय का...? असे प्रश्न उपस्थित होतायत...हा प्रश्न महिलांचा असल्याने याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वाशिंग मशीन 2025 अशी योजना आणणार आहे. या योजनेतून सरकार महिलांना वाशिंग मशीन वाटणाराय.

ladki bahin yojana
Gunaratna Sadavarte: मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांची मराठीवरून खडाजंगी, कॉल रेकॉर्डिंग वायरल, VIDEO

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्याने आमच्या टीमने सरकारने अशी योजना आणलीय का...? तसंच ही योजना असेल तर कोणत्या महिला पात्र असतील...? याची माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

ladki bahin yojana
Manikrao Kokate: शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी; कृषीमंत्री कोकाटेंनी बळीराजालाच ऐकवलं; दिलेल्या पैशांनी तुम्ही पोरांचे साखरपुडा अन् लग्न लावतात, VIDEO

फ्री वॉशिंग मशीन' अशी सरकारची योजना नाही

लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारचीच योजना

1500 रुपयांशिवाय लाडकींसाठी इतर योजना नाही

'फ्री वॉशिंग मशीन'चा दावा दिशाभूल करणारा

सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करतंय...कधी लाडका भाऊ, तर कधी लाडका शेतकरी...अशा योजना सुरूच असतात...मात्र, राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे...सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देतं...त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं, असं अनेकांना वाटू लागलंय...मात्र, ही योजना नसून, महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com